land  Dainik Gomantak
गोवा

Land Scam In Goa: दुसऱ्याची जमीन परस्पर विकली

Land Scam In Goa: दाम्पत्यावर गुन्हा: प्रकरण एसआयटीकडे सोपवणार

दैनिक गोमन्तक

Land Scam In Goa: बनावट कागदपत्रे तयार करून बेलॉय-नुवे येथील सुमारे 19 हजार चौरस मीटर जमीन नागवाडो-बेताळभाटी येथील डिसोझा दाम्पत्याने विक्री करत 2.20 कोटींना सौदा केला. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जीत जैन यांनी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

त्यानुसार मायणा-कुडतरी पोलिसांनी आग्नेल आणि मॅकलिन डिसोझा यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्रीचा हा व्यवहार 2017 साली झाला होता. नागवाडो-बेताळभाटी येथील आग्नेल आणि मॅकलिन डिसोझा या दाम्पत्याने बनावट कागदपत्रे तयार करून बेलॉय-नुवे येथील 19,250 चौरस मीटर जागा जीत जैन यांना 17 जुलै 2रोजी विकली.

त्यासाठी प्रारंभीची रक्कम म्हणून 2 कोटी 20 लाख रुपये जैन यांनी डिसोझा यांना अदा केले. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात डिसोझा यांनी चालढकल केली.

याबाबत संशय आल्याने जैन यांनी जमिनीसंदर्भात चौकशी केली असता, विक्री केलेल्या जमिनीचा मूळ मालक पोर्तुगीजमधील असून त्याने ही जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे दिसून येताच जैन यांनी मायणा-कुडतरी पोलिसांत तक्रार दिली. हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT