Officials inspected vehicles and roads Dainik Gomantak
गोवा

Goa SCO Meeting : अधिकाऱ्यांनी घेतला SCOबैठकीच्या तयारीचा आढावा; रस्ते, ट्राफिकची पाहणी

बैठकीत 8 देशांचे विदेशमंत्री सहभागी होणार

Rajat Sawant

गोव्यात 4 व 5 मे रोजी SCOच्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. बाणावलीत ही बैठक होणार आहे. यात SCO संघटनेतील विदेशी मंत्री सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज या बैठकीसाठीचे सचीव, नोडल शिष्टाचार अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी पाहणी केली. दाभोळी विमानतळ ते बाणावली पर्यंतच्या रस्त्यांची वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पाहणी केली.

यावेळी रॉड्रिग्स यांनी संबंधीत खात्यांच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या. आरटीओ, पीडब्ल्यूडी, डीआय कलेक्टर, पोलीस, वीज आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संजीत रॉड्रिग्स यांनी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करण्यात येतील. वाहतुक समस्या असली तरी त्या दृष्टिने सर्व काळजी घेण्यात येत आहे" असे सांगितले.

विदेशी मंत्र्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला भारताचे विदेशमंत्री एस जयशंकर, चीनचे विदेशमंत्री क्वीन गॅंग, रशियन विदेशमंत्री सर्जी लावरोव उपस्थित राहणार आहेत. 4 व 5 मे रोजी ही बैठक होणार आहे.

बैठकीत 8 देशांचे विदेशमंत्री सहभागी होणार आहेत आणि यामध्ये रशिया, पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांच्या विदेशमंत्र्यांचाही सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सिद्धताही केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT