Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: दूधसागरकडे पर्यटकांची पाठ; शुल्कवाढीमुळे घटली संख्या

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Waterfall: दूधसागर येथे पर्यटकांची ने-आण करण्‍यासाठी जीपगाड्या घेऊन स्‍थानिक युवक आपला व्यवसाय स्थिरस्थावर करत असतानाच पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेले ॲप दूधसागरचे दर्शन घडविणाऱ्या जीप व्‍यवसायाला संपुष्‍टात आणण्‍यास कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप हे व्यावसायिक करत आहेत. हा व्‍यवसाय या ॲपमुळे पूर्णत: धोक्‍यात आला असून तो ॲप सरकारने बंद करावा, अशी मागणी या व्यवसायातील जीपमालक करीत आहेत. या ॲपनुसार प्रत्‍येक पर्यटकामागे लावलेल्‍या जीएसटी करामुळे ५६० रुपयांचे प्रवास शुल्‍क जवळपास एक हजारावर पोहोचले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्‍या कमी झाल्‍याने पाच दिवसांतून एकदा एक भाडे जीपमालकांना मिळत आहे.

स्थानिक युवकांनी पर्यटकांची दूधसागरावर ने-आण करण्यासाठी आपल्या जीपगाड्या लावल्या आहेत. एकूण चारशे जीप तेथे चालतात. पूर्वी प्रतिपर्यटक ५६० रुपये शुल्क आकारून पर्यटकांना दूधसागराची सफर घडवून आणली जात होती. त्यामुळे पर्यटकांचे लोंढे कुळेत दाखल होत होते.

हजारो पर्यटकांमुळे प्रत्येक जीपमागे दरदिवशी पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळायचे. कधी कधी तर दिवसाला दोन खेपासुद्धा व्हायच्या, पण हा व्यवसाय व्यवसाय चांगल्या पद्धतीने चाललेला असताना अचानक ३ जानेवारीपासून पर्यटन महामंडळाने ॲप लागू केले आणि आता जीपमालकांवर पर्यटकांची संख्या रोडावल्याने बसून राहण्याची वेळ आली आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास चालकांचा पगार, वाहन विमा, कर, पासिंग, दुरुस्ती खर्च व गाडीचे हप्ते काढून हातात कवडीही राहणार नाही, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे.

गेल्या वर्षी याच एप्रिल महिन्यात दरदिवशी एक खेप मारणाऱ्या जीपगाड्यांना आता पाच दिवसांत एक खेप मिळू लागली आहे. पर्यटकांची संख्या पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्याचा परिणाम केवळ जीप व्यवसायावरच नव्हे, तर दुकान आणि हॉटेल व्यवसायावरही झालेला आहे.

शुल्कवाढीमुळे पर्यटकांची दूधसागरकडे पाठ

काही टूर ऑपरेटरशी चर्चा केली असता ते म्हणाले, दुसऱ्या राज्यांतून येणारे पर्यटक एकाच बरोबर अनेक पर्यटनस्थळांची निवड करतात. त्यात दक्षिण गोव्यातील दूधसागर धबधब्याचाही समावेश असतो. या चार महिन्यांत वाढलेल्या शुल्कामुळे पर्यटकांनी दूधसागराकडे पाठ फिरवली आहे. दर दिवशी २७५ जीपगाड्या सोडण्याची परवानगी असली तरी सध्या १५० पेक्षा अधिक जीपगाड्या धबधब्यावर जात नाहीत अशी आजची स्थिती आहे. पर्यटक कुळे बाजारात आल्यानंतर वाढलेले शुल्क पाहून माघारी फिरत आहेत. त्यामुळे कुळे येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.

या ॲपमुळे दूधसागरचा पर्यटन व्यवसाय संकटात आला आहे. जीपगाड्यांचे व्यवस्थापन सरकार करत नाही. त्यामुळे जीएसटी सरकारला का द्यावा? पूर्वी आम्ही जे शुल्क घेत होतो, तेवढे मिळाले तरी चालेल. पर्यटकांना लुबाडून आम्हाला आमचे खिशे भरायचे नाहीत.

- तन्वेश रिवणकर, जीपमालक, कुळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT