stray dogs  Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs :भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला! सर्वसामान्यांना धोका

दरम्‍यान, काही दिवसांपूर्वी ताळगाव येथे एका कुत्र्याने केलेल्‍या हल्‍ल्‍यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Stray Dogs :पाळी, राज्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. उसगाव-पाळीसह कुर्टी व इतर भागात भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. या भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सरकारी यंत्रणेने प्रभावी उपाययोजना आखावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्‍यान, काही दिवसांपूर्वी ताळगाव येथे एका कुत्र्याने केलेल्‍या हल्‍ल्‍यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली होती.

फोंड्यासह कुर्टी तसेच पुढे उसगाव-पाळीतील महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांवर विशेषतः दुचाकीस्वारांवर ही कुत्री तुटून पडतात. काहींवर तर हल्ले होण्याचे प्रकारही घडले आहेत.

रात्री दहानंतर रस्त्यांवरून फिरण्याची सोय राहिली नसून कळपाने रस्त्यावर फिरणाऱ्या या भटक्या कुत्र्यांकडून एखादी दुचाकी येताना दिसली अथवा एखादा पादचारी रस्त्याने जाताना दिसला की त्याच्यामागे लागण्याचा प्रकार हा नित्‍याचाच बनला आहे.

भटकी कुत्री मागे लागण्याच्या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना हटकून अपघात होत आहेत. महिन्याकाठी किमान शंभर जणांना चावे घेण्याचे प्रकार तर घडतच आहेत.

यात चावे घेतलेले काही लोक खासगी रुग्णालयांत जातात, तर बरेच जण सरकारी इस्पितळांत उपचार घेतात. मात्र दर महिन्याला हा आकडा शंभरपेक्षा जास्त असल्याने हे प्रकरण सध्या गंभीर बनले आहे.

या समस्‍येवर नेमक्या पणाने उपाययोजना हवी. पण तात्पुरते उपाय केले जातात. त्याचे दूरगामी परिणाम मिळणारे यश हे गुलदस्त्यात राहते. पुन्हा मग अशा प्रकारच्या समस्‍या उद्‌भवतात.चर्चा होते. एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. टोकाची भूमिका घेतली जाते. मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची हत्या केली जाते. तथापि, त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.

रात्री-अपरात्री गोंगाट

भटक्या कुत्र्यांकडून रात्री-अपरात्री भुंकण्याचे प्रकार होत असल्याने लोकांना शांत झोप मिळणे कठीण बनले आहे. रात्री दुचाकीस्वार किंवा पादचाऱ्याच्या मागे धावण्याच्या प्रकारामुळे अनेकजण जायबंदी झालेले आहेत.

त्यामुळे रात्री एकटे-दुकटे फिरणेही मुश्‍‍कील ठरले आहे. या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीच सरकारी यंत्रणा नाही. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कित्‍येकाने सोडली नोकरी!

पाळी, उसगाव भागातील काही युवक कुंडई तसेच वेर्णा भागात कामाधंद्याला जातात. रात्रपाळी असल्यावर त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग उद्भवतो. रात्रीच्या वेळी कामावर जाताना किंवा घरी परतताना ही भटकी कुत्री मागे लागून काही युवकांना अपघातही झाले आहेत.

त्यामुळे कुत्र्यांच्या भीतीने काही युवकांनी हे कामच सोडून देण्याचे प्रकार घडले आहेत. हे सगळे धक्कादायक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रात्रीच्यावेळी भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे अपघातांचे प्रकार वाढले आहेत. या भटक्या कुत्र्यांवर कोणत्याच सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे ही कुत्री रात्रीच्या वेळी दुचाकीच्या किंवा एखाद्या रस्त्याने चालत जाणाऱ्याच्या मागे लागत असल्याने गंभीर प्रकार उद्भवत आहेत. सरकारने या प्रकरणी तातडीने पावले उचलावीत.

- सूरज गरड, पिळये-तिस्क, उसगाव

‘कुणी तरी आवरा या भटक्या कुत्र्यांना’ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. कारण रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्याची सोय राहिलेली नाही. लोक जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. रोज किमान दोन ते तिघाजणांना ही भटकी कुत्री चावे घेत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आज खरी गरज आहे.

- रामचंद्र वळवईकर, पाळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT