Panaji Municipal Corporation Budget  Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Corporation : महापालिकेच्या नव्या इमारतीला मुहूर्त सापडेना..!

इमारत पाडण्याबाबत घाई कशासाठी? : परवानग्या मिळविण्यात होतोय विलंब

दैनिक गोमन्तक डिजिटल

महानगरपालिकेला नूतन इमारतीचा मुहूर्त कधी मिळणार हे काही सांगता येत नाही. जानेवारी महिन्यात महानगरपालिकेने सध्याच्या इमारतीशेजारील जुनी पोर्तुगीजकालीन इमारत पाडली. त्या ठिकाणी नव्याने इमारत बांधण्याचे नियोजनही केले; परंतु ज्या परवानग्या नगर नियोजन खात्याच्या हव्या होत्या, त्या घेतल्या नसतानाही इमारत पाडण्यात आल्याची चर्चा सध्या नगरसेवकांमध्ये आहे.

जुन्या इमारतीत चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा होती. त्यांना दुपारची विश्रांती घेण्यासाठी किंवा जेवणासाठी येथील जागेचा वापर होत होता. परंतु आता इमारत पाडल्याने या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या इमारतीबाहेरील पदपथावर बसावे लागत आहे.

सध्या उन्हाळा आहे म्हणून ठिक आहे; परंतु पावसाळ्यात कदाचित इमारतीच्यावरील पत्र्याखाली त्यांची सोय करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अगोदरच सध्याच्या इमारतीचा अनेक भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या वरील पत्र्याखाली ठेवणेही धोक्याचे बनू शकते.

महापालिकेने जानेवारी महिन्यात इमारत पाडण्यास सुरवात केली आणि काही आठवड्यात ती जमीनदोस्त झाली.

कोणीही जाब विचारत नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत पाडण्यासाठी जी नगर नियोजन खात्याची परवानगी लागते ती घेण्यापूर्वीच महापालिकेने कार्यभार उरकला आहे. सध्या हा विषय नगरसेवकांमध्ये चर्चेचा बनला आहे.

परंतु एकही नगरसेवक याबाबत जाब विचारण्यासाठी पुढे येत नाही. इमारतीचा जो आराखडा तयार केला होता, तो आता नव्याने केला गेला असल्याचे अधिकारी सांगत आहेत. काही झाले तरी इमारत पाडण्याची घाई कोणाला झाली होती? असा सवाल उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT