Bicholim

 

Dainik Gomantak 

गोवा

डिचोलीत 'नवा सोमवार' उत्सावानिमित्त बरसल्या स्वरधारा

डिचोलीतील (Bicholim) श्री शांतादुर्गा देवीच्या 'नवा सोमवार' उत्सवाला मंगल आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: श्री देवीचा जयघोष, पालखी मिरवणूक, स्वरधारांची बरसात आणि हजारो भक्तगणांच्या साक्षीत डिचोलीतील (Bicholim) श्री शांतादुर्गा देवीच्या 'नवा सोमवार' उत्सवाला मंगल आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला आहे. डिचोलीतील 'नवा सोमवार' संपूर्ण गोवा तसेच राज्याबाहेर प्रसिद्ध आहे. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे तर आतीलपेठ येथील मठ मंदिरात आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळ नवा सोमवार उत्सव समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. नवा सोमवार उत्सवानिमित्त दोन्ही मंदिरात सकाळपासून दिवसभर विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. दुपारी आरती आणि तीर्थप्रसाद झाला.

नवा सोमवारनिमित्त सकाळपासूनच देवीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भक्तांची पावले मंदिरस्थळी वळत होती. दुपारनंतर भक्तांच्या संख्येत हळूहळू वाढ होत होती. काळोख पडताच भक्तांची गर्दी उसळली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भक्तांनी देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. रात्री श्री शांतादुर्गा देवीला गाऱ्हाणे घातल्यानंतर बँडवादन आणि जयघोषासह देवीच्या पालखी मिरवणुकीला सुरवात झाली.

स्वरधारांची बरसात

नामवंत गायक कलाकारांच्या गायन मैफिलीमुळे नवा सोमवार उत्सवाच्या आनंदात अधिकच भर पडली. रात्री उशिरा श्री शांतादुर्गा देवीच्या प्रांगणात सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी (पुणे) गायिका सौ. मनिषा निश्चल (मुंबई) यांच्या 'स्वर सुमनांचे झेले' या नाट्य, भक्ती आणि भावगीत गायनाच्या मैफीलीला, तर आतीलपेठ मठ मंदिरात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका सौ. दिपीका भिडे भागवत आणि गायक धनंजय म्हसकर यांच्या गायन मैफिलीला प्रारंभ झाला. दोन्हीठिकाणी संगीतप्रेमीनी गर्दी केली.

मंगलमय वातावरण

नवा सोमवारनिमित्त शहरात सकाळपासून मंगल आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती येत होती. श्री शांतादुर्गा मंदिरांसह शहरात सर्वत्र करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे काळोख पडताच मनोहरी दृष्य पसरले होते. 'कोविड' मुळे गेल्यावर्षी दुकानांच्या फेरीवर नियंत्रण होते. यंदा खाजे आणि अन्य साहित्याच्या दुकानांची फेरी भरली आहे. उत्सव सुरळीतपणे पार पडावा, यासाठी पोलिस, अग्निशामक दल आदी सरकारी यंत्रणा सज्ज होती. वाहतूक पोलिस वाहतुकीवर नियंत्रण ठेवून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT