Margao Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सवतीनेच दोन मुलांना पळवले, नंतर सोडले वाऱ्यावर

Goa Crime News: आईचा दावा: ‘त्‍या’ मुलांची जन्मदात्री मडगाव पोलिसांत हजर

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मडगावात दोन मुलांना सोडून गेल्याची घटना उघडकीस आली होती. त्‍यानंतर त्यांच्या पालकांचा शोध सुरू होता. अखेर हे गूढ उकलले आहे. अंजली पांडे (मध्यप्रदेश)नामक महिला मडगाव पोलिसांत हजर झाली असून तिने ‘त्‍या’ मुलांची आई असल्याचा दावा केला आहे.

सवत निकिताने माझ्‍या मुलांचे अपहरण करून मडगावात टाकून पळ काढला, असा आरोपही तिने केला आहे. दि. 27 जानेवारीला एक तीन वर्षांची मुलगी गांधी मार्केटमध्ये दोन वर्षांचा मुलगा रेल्‍वेस्‍थानकावर सापडला.

आज सकाळी रेल्‍वे पोलिसांना भेदरलेली अंजली रेल्वे स्थानकावर आढळली. तिने रेल्‍वे पोलिसांना ‘वन स्‍टॉप’च्‍या आवदा व्‍हिएगस यांच्यासमक्ष चार दिवसांपूर्वी काय घडले, हे सांगितले. मनू पांडे (बिहार) असे अंजलीच्या पतीचे नाव आहे.

ती मनूची दुसरी पत्‍नी आहे. पहिली पत्‍नी निकिता दोन मुलांबरोबर बिहारमध्‍ये राहते तर, मनू अंजलीसोबत जुन्नर-पुणे येथे रहात होता. तिथेच त्‍यांना ही दोन मुले झाली.

मनू आजारी असल्याचे कळताच निकिता तिच्या दोन्‍ही मुलांना घेऊन पुण्‍याला गेली. त्‍याला उपचारांसाठी म्हणून मनू, अंजली,निकिता, दोघींची चार मुले हे सर्वजण बिहारला गेले. पण थंडीमुळे ते रेल्वेने गोव्यात येण्‍यास निघाले.

निकीताने मोबाईल, सामान काढून घेतले ! अंजली म्हणाली, गोव्‍यात पोचल्‍यावर त्‍यांच्यात वाद झाला. त्‍यानंतर मला एकटीलाच रेल्‍वेत सोडून बाकी सगळे उतरले. त्‍यावेळी निकिताने माझ्या दोन मुलांनाही बरोबर नेले, माझा मोबाईलही काढून घेतला.

त्‍यामुळे आपण भांबावून गेले. नंतर मी मंगळुरुला पोचल्‍यानंतर उतरले. दरम्‍यान निकिताने माझ्या मुलांना प्रियकराच्‍या मदतीने मडगावात सोडले.

बिहारहून गोव्यात येण्याचे कारण काय?

अंजलीने दिलेल्या माहितीमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे पोलिसांना आढळले. कारण ते सगळेजण बिहारमधून गोव्यात का आले? हे अंजलीला सांगता आले नाही. सध्या अंजलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत;

तसेच निकीता व तिच्या प्रियकराचा शोधही घेत आहेत. मडगाव पोलिसांनी अंजलीच्‍या मुलांचे अपहरण करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी आवदा व्‍हिएगस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT