Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: आमोणेत वाड्यांवर घुमतोय घुमट आरतीचा मधुर नाद

Goa Ganesh Chaturthi 2023: प्रत्येक घरात भक्तीमय उत्सवी वातावरण असून प्रत्येक घरात श्री गणेशाचे पूजन होते.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: आमोणे येथील सात वाडीतील प्रत्येक वाडीत अवघ्याच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झालेले असून प्रत्येक वाडीत बहुसंख्येने पाच दिवशीय गणेशोत्सव होत आहे. प्रत्येक घरात भक्तीमय उत्सवी वातावरण असून प्रत्येक घरात श्री गणेशाचे पूजन होते.

तर काही वाड्यावर सकाळ व संध्याकाळच्या सत्रात रात्रीपर्यंत तर काही वाड्यावर संध्याकाळी त्या त्या वाड्यावरील युवक प्रत्येक गणपतीपुढे घुमट आरती करून भक्तीमय वातावरण निर्माण करतात. शनिवारी पाच दिवशीय गणेशांचे विसर्जन वर्षपध्दतीप्रमाणे नियोजित आंबेशी येथील मानशेर, शेकरर तसेच तारीवर फेरी धक्क्यावर करण्यात येणार आहे. फुगडी, दिंडी, भजन आदी कार्यक्रम होईल. यानिमित्त सरपंच कृष्णा गावस, पंच गौरवी गावस, दिया सावंत, वसंत सिनारी, सागर फडते, अनिशा आमोणकर, वासुदेव घाडी आदींनी आपापल्या प्रभागात घरोघरी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

SCROLL FOR NEXT