Rohit Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City : पणजीतील 'ती' सर्व कामे 'या' तारखेनंतर होणार बंद; महापौरांनी घेतला निर्णय

‘जी-२०’ बैठकांच्या आयोजनाचा मान यंदा भारताला मिळाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City : पणजी महापालिका कार्यक्षेत्रात सध्या स्मार्ट सिटी मिशन तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे 15 मार्चपर्यंत चालतील, त्यानंतर ती बंद केली जातील अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

‘जी-२०’ बैठकांच्या आयोजनाचा मान यंदा भारताला मिळाला आहे. या बैठकांपैकी एक बैठक गोव्यात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पणजी शहरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पणजी स्मार्ट सिटीच्या युनिव्हर्सल रोडचे काम सुरू आहे. या कामांमुळे जागोजागी खड्डे खणण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पणजी शहर परिसरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत. मात्र, एक ना धड आणि भाराभर चिंध्या, अशा प्रकारची अवस्था शहर परिसरात सुरू असलेल्या कामांची झालेली आहे. जीव मुठीत घेऊन नागरिकांना ये-जा करावे लागत असल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या खोदकामांमुळे पार्किंगसाठीदेखील जागा नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना तरी घरातून बाहेर पडेणेदेखील अशक्यप्राय होऊन बसले आहे. त्यामुळे पणजीतील नागरिक महापालिकेच्या या अपरिपक्व नियोजनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त करत आहेत. हा सर्व प्रकार आणि त्रास केवळ आणि केवळ नियोजनाच्या अभावामुळे होत असल्याची चीड नागरिक व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT