Margaon Municipality Dainik
गोवा

Margaon Municipality: मडगावात पाच पथकांकडून वसुली मोहिमेला सुरवात

Margaon Municipality: मडगाव पालिकेने 12 कोटी रुपयांच्‍या थकबाकी वसुलीसाठी आता पाच पथकांची नियुक्‍ती केली आहे.

दैनिक गोमन्तक

Margaon Municipality: मडगाव पालिकेने 12 कोटी रुपयांच्‍या थकबाकी वसुलीसाठी आता पाच पथकांची नियुक्‍ती केली आहे. या पथकांनी गुरुवारपासून वसुली मोहिमेला सुरवात केली आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटिसाही पाठविल्‍या आहेत.

विनापरवाना आस्‍थापने आढळून आल्‍यास त्‍यांनी व्‍यवसाय परवाने घ्‍यावेत, असे निर्देश देण्‍यात येतील. परवाने न घेतल्‍यास आस्‍थापने सील करण्‍यात येतील, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

गुरुवारपासून वसुली मोहीम चालू केलेल्‍या या पाच पथकांमध्‍ये पहिल्‍या पथकात प्रभाग क्र. १४, १६, १७, १८ व १९ मध्‍ये वसुली अधिकारी राजेंद्र भगत, पालिका बाजार निरीक्षक सांतो फर्नांडिस, पालिका कामगार व्‍हिन्‍सेंट फर्नांडिस. दुसऱ्या पथकात प्रभाग क्र. १५, २०, २१, २२ व २३ मध्‍ये वरिष्‍ठ कारकून दिलीप खानापूरकर, पालिका बाजार निरीक्षक महेश वेळीप व कामगार बाप्तिस्‍त फर्नांडिस.

तिसऱ्या पथकात प्रभाग क्र. १, २, ३, ४ व ५ मध्‍ये पालिका बाजार निरीक्षक जुझे फुर्तादो, पर्यवेक्षक नितीन नाईक व कामगार भिमाप्‍पा जामुनी. चौथ्‍या पथकात प्रभाग क्र. ६, ७, ८, ९ व १० मध्‍ये कनिष्‍ठ कारकून रामकुमार जामुनी, कामगार सेबेस्तियान डायस व प्रेमानंद गावकर.

पाचव्‍या पथकात प्रभाग क्र. ११, १२, १३, २४ व २५ मध्‍ये पालिका बाजार निरीक्षक शेखर गावकर, कामगार रामप्‍पा हिरगळ व शिवानंद कांबळी यांच्‍याकडे वसुली मोहीम राबविण्‍याची जबाबदारी असेल. रोजच्‍या वसुलीसंदर्भातील अहवाल मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT