Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: बदलत्या माध्यमांच्या लाटेत मराठी भाषेचे काय होणार ?

Goa Latest News: साहित्य संमेलनात चिंता: ‘प्रसार माध्यमांचा मराठी भाषेवर प्रभाव’

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: इतर भाषांचे मोकाट मिश्रण वाढत चालले आहे. या अतिक्रमणाचा परिणाम मराठी भाषेवरही झालेला दिसत आहे. आज प्रसार माध्यमांमुळे मराठी भाषेचे स्वरूप बदलत चालले आहे. इंग्रजी, हिंदी भाषांचा काळ निर्माण झाला असून स्थानिक भाषांकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे या बदलत्या माध्यमांच्या लाटेत मराठी भाषेचे पुढे काय होणार अशी चिंता, बृन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आयोजित मराठी साहित्य संमेलनात व्यक्त करण्यात आली. ‘प्रसार माध्यमांचा मराठी भाषेवर प्रभाव’ परिसंवादात ही चिंता सहभागी वक्त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या काळात मराठी भाषेवर नेमका काय प्रभाव आहे याचा उहापोह परिसंवादात झाला. डॉ. प्रमोद भगवान पडवळ अध्यक्षस्थानी होते. यात पत्रकार सागर जावडेकर, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, बेळगावातील पत्रकार गोपाळ गावडा, काशी येथील संतोष सोलापूरकर, इंदूर येथील अरविंद जवळेकर आणि भोपाळ येथील ज्येष्ठ पत्रकार अजय बोकील यांच्या समावेश होता.

कृष्णाजी कुलकर्णी म्हणाले, आज माध्यमांचा वेग वाढत चालला आहे. त्यात प्रामुख्याने मराठीचा वापर होताना दिसत नाही हा मुख्य धोका आहे.

गोपाळ गावडा यांनी सांगितले की, प्रसार माध्यमांचा मराठी भाषेवर आज परिणाम जाणवत आहे. त्यात चित्रपटासह इतर समाज माध्यमांमुळे दूरगामी परिणाम जाणवत आहे, त्यामुळे आपल्या भाषेबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

वाचन संस्कृती कमी होत असल्याने, समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे भाषा सुधारण्यासाठी माणसाने समृद्ध होणे गरजचे आहे,असे मत अरविंद जवळेकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT