Goa Flowers Bloom Dainik Gomantak
गोवा

Goa Flowers Bloom: ‘ग्रीष्माचा राजा’ गुलमोहर बहरला! सौंदर्याची मुक्त हस्‍ते उधळण

फुलांची उधळण करीत ग्रीष्मातला हा राजा प्रत्येकाशी मुक्त संवाद साधत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तुकाराम सावंत

निसर्गाने सौंदर्यांचे भरभरुन वरदान दिलेले गुलमोहराचे झाड म्‍हणजे निरुपयोगी आणि कमकुवत झाड. मात्र, ज्यावेळी गुलमोहर रसरसून फुलतोय, त्यावेळी प्रत्येकाला या झाडाबद्दल कुतूहल निर्माण होते.

एरवी दुर्लक्षित असणारे हे झाड ज्यावेळी लाल-केशरी फुलांनी बहरुन येते, त्यावेळी त्‍याचे सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित केल्यावाचून राहत नाही. ‘ग्रीष्मातला राजा’ असलेला गुलमोहर सध्या आपल्या सौंदर्याचे खरे रुप प्रकट करू लागला आहे.

असंतुलीत हवामानामुळे यावर्षी गुलमोहर बहरण्यावर परिणाम होण्‍याचा अंदाज होता. मात्र गुलमोहराने यावर्षीही आपल्या सौंदर्यात अजिबात कंजुषपणा दाखवला नाही. उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत या झाडाकडे पाहिल्‍यास डोळ्‍यांना शीतलता तसेच गारवा मिळतो.

सगळीकडे दिसू लागली लाल-केशरी फुले: फुलांची उधळण करीत ग्रीष्मातला हा राजा प्रत्येकाशी मुक्त संवाद साधत आहे. डिचोलीत सर्वत्र गुलमोहराची झाडे असून, ही झाडे लाल-केशरी फुलांनी बहरु लागली आपल्या नैसर्गिक सौंदर्याची उधळण करू लागली आहेत. सध्‍याच्‍या रखरखत्‍या उन्‍हात हा गुलमोहर डोळ्‍यांना शीतलता व सावलीद्वारे गारवा देत आहे.

डिचोली-कारापूर-तिस्कदरम्‍यान तब्‍बल 45 गुलमोहर

डिचोली-साखळी हमरस्त्यावरील गुलमोहराची झाडे सध्या लाल-केशरी फुलांनी बहरु लागली असून, या रस्त्यावरुन येजा करणाऱ्यांचे ती लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गचक्राच्या नियमाप्रमाणे वसंत ऋतुत प्रत्येक झाडांना पालवी फुटण्यास प्रारंभ होतो.

मात्र या काळात गुलमोहर आपले खरे अस्तित्व दाखवायला सुरूवात करतात. वास्तविक मे महिना म्हणजे रखरखत्या उन्हाचे दिवस.

मात्र, या रखरखत्या उन्हातही फुलांनी बहरत असल्यामुळे गुलमोहराच्या सौंदर्यात भर पडत असते. डिचोली ते कारापूर-तिस्कपर्यंतच्या साधारण सहा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यावर लहानमोठी मिळून जवळपास 40 ते 45  गुलमोहराची झाडे आहेत, हे विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT