Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: शिवानीच्या मृत्यूचा उलगडा! लवकरच चौकशी पूर्ण

Goa Crime News: दोन दिवसांत अहवाल शक्‍य

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: गॅस गळतीनंतर झालेल्‍या स्‍फाेटात वास्‍को येथे मरण पावलेल्‍या शिवानी राजवत हिच्‍या मृत्‍युप्रकरणी मुरगावचे उपजिल्‍हाधिकारी भगवंत करमली यांनी सुरू केलेली चौकशी पूर्ण झाली असून एक-दोन दिवसांत ते पोलिसांना अहवाल सादर करणार आहेत. हा मृत्‍यू अपघात की घातपात, हे या अहवालानंतरच स्‍पष्‍ट होणार आहे.

18 नोव्‍हेंबर रोजी नवेवाडे-वास्‍को येथे ही दुर्घटना घडली होती. त्‍यात शिवानीबरोबरच तिची आई जयदेवी सिंग यांचाही मृत्‍यू झाला होता. हा मृत्‍यू अपघाती नसून हुंड्यासाठी शिवानीचा पती अनुराग याने मुद्दाम घडवून आणलेला घातपात आहे, असा आरोप शिवानीचा भाऊ शुभम सिंग याने केला होता. हा मृत्‍यू लग्‍न होऊन सात वर्षांच्‍या आत झाल्‍याने उपजिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जात होती.

मिळालेल्‍या माहितीनुसार, उपजिल्‍हाधिकारी करमली यांनी एकूण पाचजणांच्‍या जबान्‍या नोंद केल्‍या असून त्‍यात शिवानीचा भाऊ शुभम सिंग, पती अनुराग, सासू यांच्‍यासह त्‍यांच्‍या दोन शेजाऱ्यांचा त्‍यात समावेश आहे. शिवाय अग्निशमन दल आणि पोलिसांनी केलेल्‍या तपासाचा अहवाल ही चौकशी करताना विचारात घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT