Goa News Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून, कलंकाच्या भीतीने मिरामार येथे सोडले बेवारस; आई पोलिसांच्या ताब्यात

महिला विधवा असून अनैतिक संंबंधातून हे अर्भक जन्मले होते.

दैनिक गोमन्तक

Goa News: मिरामार येथे दोन दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या नवजात अर्भकाच्या मातेचा पणजी पोलिसांनी शोध घेऊन तिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. ही महिला विधवा असून अनैतिक संंबंधातून हे अर्भक जन्मले होते.

अर्भक घरी नेल्यास चारित्र्याला कलंक लागेल, या भीतीने तिने ते मिरामार येथे टाकले आणि घरी गेली, अशी जबानी तिने पोलिसांना दिली आहे.

या अर्भकावर गोमेकॉत उपचार सुरू असून ते सुखरूप असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. पणजी शहराबाहेर भाडेपट्टीवर राहात असलेल्या ३३ वर्षीय गोमंतकीय महिलेचा पती काही वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू पावला. तिला एक लहान मुलगा असून नातेवाईकांपासून ती वेगळी राहते. अनैतिक संबंधातून ती गरोदर राहिली. त्यानंतर ती स्वतःच गोमेकॉत बाळंतपणासाठी दाखल झाली.

तिच्यासोबत कोणीही नव्हते. डॉक्टरांनी तिला इस्पितळात दाखल करून घेतले. चार दिवसांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय तिने स्वतः इस्पितळातून डिस्चार्ज घेतला आणि त्याच दिवशी ती बसने मिरामार येथे दुपारी आली. पर्रीकर यांच्या समाधीस्थळामागील एका भिंतीजवळ असलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये अर्भक ठेवले आणि ती घरी निघून गेली.

पणजी पोलिसांनी सोमवारी (25 डिसेंबर) ते अर्भक ताब्यात घेतले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये हार्डडिस्क नव्हती. त्यामुळे माहिती मिळण्यात अडचणी आल्या. मात्र, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पणजीचे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी साध्या वेशातील पोलिसांना कामाला लावून मुलाला घेऊन महिलेला कोणी पाहिले आहे का, याचा शोध घेतला. दुसऱ्या बाजूने गोमेकॉत तसेच काही खासगी इस्पितळांतूनही माहिती मिळवली.

गोमेकॉत एका महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांची परवानगी न घेताच ती गेली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या महिलेची माहिती इस्पितळातून घेऊन तपास केला असता, त्या बेवारस अर्भकाच्या मातेचा शोध लागला.

तिला घरातून ताब्यात घेतले असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अर्भक आणि आईची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

परिचारिकांना आला होता संशय

या महिलेची स्थिती हलाखीची आहे. ती गोमेकॉत दाखल झाली, तेव्हा तिच्याकडे औषधोपचारासाठीही पैसे नव्हते. ती एकटीच दाखल झाल्याने गोमेकॉतील परिचारिकांनाही तिच्याबाबत संशय आला होता. पोलिसांनी तिचे केस पेपर्स पडताळून पाहिल्यानंतर तिचा ठावठिकाणा मिळाला. अर्भकाला इस्पितळातून डिस्चार्ज दिल्यानंतर ते बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT