shigmo festival dainik gomantak
गोवा

सत्तरीतील शिमगोत्सव महिलांचा वाढता सहभाग स्तुतीदायक

शहरी रंगपंचमीचे चित्रण सत्तरीतील ग्रामीण भागात

दैनिक गोमन्तक

पर्ये : सत्तरीतील पारंपरिक शिमगोत्सवात पुरुषांची मक्तेदारी असायची. स्त्रियांनी केवळ 'करवाल्यांची' पूजा करणे आणि ओट्या भरणे यापलीकडे त्यांची बघ्यांची भूमिका असायची. पण गेल्या काही वर्षांपासून हिवरे बुद्रुक येथील महिला सातत्याने सोकारती गायन करीत पुरुषांच्या बरोबरीने करवल्या उत्सवात सहभागी होत आहे. गेल्या वर्षांपासून मोर्लेतील मुलीही करवल्या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. तर यंदा यात भर पडली ती शिरोली, रावण - कॉलनी (केळावडे) येथील महिला- युवतींची. त्या या उत्सवात पुरुषांच्या बरोबरीने सामील झाल्या. या काही वर्षात शहरी रंगपंचमीचे चित्रण सत्तरीतील ग्रामीण भागात होताना दिसते. त्यात वाड्यावाड्यावर किंवा कौटुंबिक पातळीवर रंगपंचमी खेळण्यात महिला-युवती दिसत होत्या. पण यंदा चक्क सोकारती गायन किंवा रोम्बट घालण्यात स्त्रिया- युवती सहभागी झाल्याने उत्सवाचे वेगळे चित्र दिसत आहे. (The increasing participation of Shimgotsav women in their seventies is commendable)

महिलांच्या सहभागाने सणाची रंगत वाढली

एरव्ही आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या समानतेने वावरत दिसतात पण सत्तरीतील सांस्कृतिक उत्सवात (Cultural Festival) स्त्री-पुरुषांचे वेगवेगळे कार्यक्रम असे ठरलेले होते. शिमगो (shigmo) हा पुरुषांच्या सण आणि धालोत्सव हा महिलांचा अशी विभागणी होती. पण गेल्या काही वर्षांपासून महिलांनी शिमगोत्सव आपला सहभाग दाखवत पुरुषांच्या बरोबरीने सण साजरा करीत असल्याने या सणात वेगळी रंगत येताना दिसत आहे आणि हा सण स्त्री-पुरुष (Men and women) असे दोघांसाठी दिसून येत आहे.

या गावांमध्ये दिसला महिलांचा सहभाग

यंदा शिरोली येथे सोकारती गायनावेळी तेथील काही युवतीने ढोल ताशे वाजवताना दिसले. केळावडेमध्ये तर महिला वर्ग ढोल-ताशे वाजवण्यासाहित सोकारती गायन, आणि रोम्बटात सहभागी झाल्या आणि पुरुषांच्या बरोबरीने संपूर्ण रात्र करवल्या समवेत राहिल्या. हिवरे बुद्रुक येथील महिला वर्ग सोकारती गायन, रोम्बाट आदी प्रकारात भाग घेत आहेत. मोर्लेतील युवती करवल्या गायनावेळी ताल धरतात. सत्तरीतील महिलांचा या पारंपरिक शिमगोत्सव (shigmo festival) सहभाग एकंदरीत उत्सवाच्या दृष्टीने हितकारक असून महिलांचा वाढता सहभाग स्तुतीदायक असल्याची चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT