यावेळी त्याच्या सोबत त्याच्या पत्नी रीता श्रीधरन पिल्लाई (Governor Sreedharan Pillai) उपसभापती इजिदोर फर्नांडीस उपस्थित होते. Dainik Gomantak
गोवा

'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' मानत राज्यपालांनी काणकोणातील वसतीगृहांना दिला मदतीचा हात

सर्वधर्म समभाव हे भारताचे मर्म आहे. राज्यपाल भवनाने 71 किडणी रुग्णांना डायलेसीस आर्थिक मदत दिली.ती प्रेरणा घेऊन या पुढे डायलेसीस मशिन्स देण्याची काहींनी राजभवनाकडे व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यपाल श्रीधरन पिल्लाई (Governor Sreedharan Pillai) यांनी आज काणकोण (Kankon) मधील तीन वसतीगृहांना प्रत्येकी एक लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. या दौऱ्यात त्यांनी तेंबेवाडा-चाररस्ता येथे केशव सेवा साधना संचलित माताजी मंदिर विद्यार्थी वसतीगृहाला भेट दिली. या वसतीगृहाच्या (Hostel) व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या पैंगीण येथील श्री परशुराम वसतीगृह तसेच लोलये येथे सेवा संकल्प संस्थेतर्फे चालविण्यात येणारे कन्या वसतीगृह यांनाही राज्यपालांनी आर्थिक मदतचा हात दिला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हीच भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

सर्वधर्म समभाव हे भारताचे मर्म आहे. राज्यपाल भवनाने 71 किडणी रुग्णांना डायलेसीस आर्थिक मदत दिली.ती प्रेरणा घेऊन या पुढे डायलेसीस मशिन्स देण्याची काहींनी राजभवनाकडे व्यक्त केली आहे. जनता सुप्रीम आहे त्याचमुळे त्याच्या कल्याणसाठी काम करणे महत्वाचे आहे.त्याच दृष्टीने भावनेने पंतप्रधान मोदी देशाची सेवा करीत असल्याचे राज्यपालांनी लोलये येथे सांगितले. यावेळी उपसभापती इजिदोर फर्नाडीस यांनी राज्यपालांच्या समंतीने लोलये वसतीगृहातील विद्यार्थ्यांना घेऊन एक दिवस राजभवनावर येण्याचा मनोदय व्यक्त केला.

यावेळी त्याच्या सोबत त्याच्या पत्नी रीता श्रीधरन पिल्लाई उपसभापती इजिदोर फर्नांडीस उपस्थित होते.त्याशिवाय राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई,सेवा संकल्प संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अनिता तिळवे,सचिव सदानंद आमोणकर,जेष्ठ सदस्य बाबू कोमरपंत, आनंदु म्हाळशी,लक्ष्मण वेळीप तसेच डॉ.विलास पावस्कर उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.तिळवे यांनी भविष्य काळात वसतीगृहात व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे त्या योजनेलाही राजभवन कडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व संस्थेचा अहवाल सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कामत यांनी केले.यावेळी लोलयेचे ग्राम दैवत समितीचे अध्यक्ष भूषण प्रभूगावकर यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन लोलये गावात स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT