Goa College Admission: Dainik Gomantak
गोवा

Goa College Admission: राज्यातील महाविद्यालयांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सोमवारपासून प्रारंभ

उच्च शिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa College Admission: राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवार दि. 29 पासून प्रारंभ होत आहे.

उच्च शिक्षण संचालनालय (DHE) गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी तसेच बी.ए. एल.एल.बी. बी.ए.बी.एड, संगीत, थिएटर, होम सायन्स, बीएसस्सी अॕग्रीकल्चर, बीसीए, बीबीए, पीजीडीटी, पीजीडीसीए, बीपीएड या विभागांसाठीची ही प्रथम फेरी आहे.

तरी विविध शाखांच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयातर्फे डाॕ.महादेव गावस यांनी केलेले आहे.

इथे साधू शकता संपर्क

सोमवार, 29 मे 2023 सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतील. इच्छुक अर्जदारांनी सोमवार, 29 मे 2023, सकाळी 11 वाजेपासून https://dhe.goa.gov.in/resource/getPage/ugadmissions वर उपलब्ध असलेल्या कॉमन पोर्टलद्वारे अर्ज करावेत.

विद्यार्थी त्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तसेच कोणत्याही सहाय्यासाठी प्रवेशाच्या तारखांना महाविद्यालये किंवा DHE गोवा कार्यालयात देखील भेट देऊ शकतात.

- डॉ. महादेव गवस, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा

अशा आहेत विद्यार्थ्यांना सूचना

  1. पोर्टल अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करेल.

  2. संबंधित महाविद्यालयाच्या वेबपोर्टलवर मोफत ई-प्रॉस्पेक्टस उपलब्ध असेल.

  3. सेल्फ फायनान्स प्रोग्राम्ससाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले अर्जदार देखील त्याच पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

  4. या पोर्टलद्वारे, अर्जदार त्यांच्या प्राधान्यांच्या आधारावर गोव्यातील जास्तीत जास्त तीन महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT