Election Commission Dainik gomantak
गोवा

पाच राज्यांच्या निवडणूक निरीक्षकांची बैठक, CEC ने दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे

दैनिक गोमन्तक

निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांमध्ये तैनात असलेल्या निरीक्षकांची बैठक घेतली. बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांनी आयोगाचे अधिकारी, पोलीस आणि निरीक्षकांना निवडणूक कर्तव्याबाबत त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली. यासोबतच पाचही राज्यांमध्ये निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, असे निर्देशही दिले आहेत.

बैठकीनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की, आयोगाने आज गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) तैनात केलेल्या निरीक्षकांसोबत एक ब्रीफिंग आयोजित केली आहे. या बैठकीला 1,400 हून अधिक अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने सांगितले की, आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि इतर सेवांमधून काढलेले अधिकारी जनरल, पोलिस आणि निरीक्षक म्हणून नियुक्त केले जातात. सीईसी सुशील चंद्र यांनी सर्व निरीक्षकांना एजन्सींच्या समन्वयाने काम करून निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित निवडणुका सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत मतदानासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये 10 फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत मतदान होणार आहे. गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 10 मार्च रोजी पाचही राज्यांमध्ये एकाच वेळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात (goa) भाजपचे (BJP) सरकार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. अशा परिस्थितीत आयोगाने मतदानासाठी अनेक खबरदारीची पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक रोड शो, मिरवणूक, जलसा, पदयात्रा यांवर 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT