Goa:Tony Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa: चर्च पाडण्यास दिल्ली सरकारच जबाबदार

Goa: केजरीवाल खोटे बोलत असल्याचा आमदार फर्नांडिस यांचा दावा

Yeshwant Patil

पणजी, ता. २६ (प्रतिनिधी)ः दिल्लीतील लीटल फ्लावर चर्चची (Little Flower Church) इमारत पाडण्याची सरकारला कल्पना नव्हती असे सांगणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) खोटे बोलत आहेत. दिल्ली विकास प्राधिकरणावर आम आदमी पक्षाचे पंड्या (Pandya) व भारती (Bharti) हे दोन आमदार सदस्य आहेत. त्यांनी सरकारला कारवाईची कल्पना दिली नसेल असे असूच शकत नाही, असा दावा सांताक्रूझचे आमदार आंतोनिओ (टोनी) फर्नांडिस (Tony Fernandes) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Goa)

भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मंदिरासाठी असलेली नोटीस चर्चवर चिकटवण्यात आली. नंतर ती नोटीस मागे घेतली व चर्च पाडली. मंदिर वाचले. मी मंदिरही पाडले पाहिजे असे म्हणत नाही, पण कोणत्याही कारवाईला धार्मिक रंग देऊ नये. केजरीवाल चर्च पाडली जात असताना गोव्याच्या वाटेवर होते व येथे येऊन त्यांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले. मात्र, स्थानिक सरकारच कारवाईला जबाबदार आहे. ते पुरावे गोळा करेपर्यंत वेळ लागल्याने याविषयी भूमिका घेण्यासाठी वेळ घेतला. आम आदमी पक्षाने अल्पसंख्याक ख्रिस्ती समुदायाचा भावना दुखावल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पिलार फेस्ताला बोलावले होते. त्यांनी चर्चमध्ये राहून आपण धार्मिक आधारावर भेद करणार नाही असा शब्द दिला, त्याचे कौतुक ख्रिस्ती धर्मियांना आहे. याउलट केजरीवाल फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल यांना दिल्लीतून येऊन आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आमचे मतदार आम्हाला हवा तर जाब विचारतील. आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिल्लीत भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी तेथून दूरध्वनीवर सर्व माहिती दिली आहे. आम्ही ख्रिस्ती आमदार चर्च पुन्हा उभी रहावी यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांशीही याबाबत बोलू. पक्षांतरासाठी २० कोटी रुपये घेतले नाहीत हे कोणत्याही चर्चमध्ये सांगण्याची माझी तयारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT