खारीवाडा येथे मुरगाव हिंदू समाजातर्फे धर्मशाळा येथे बांधण्यात येणारे श्री महालक्ष्मी मंदिराचे प्रलंबित राहीलेले बांधकाम. Dainik Gomantak
गोवा

Goa: महालक्ष्मी मंदीर विरोधातील याचिकेवरील निकाल मुख्य अधिकाऱ्यांनी ठेवला राखून

पराग मेहता (Parag Mehta) यांनी पालिका दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पालिका मुख्याधिकारी समोर पूर्ण झाली असून अंतिम निर्णय मुख्य अधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी - मुरगांव (Margao) हिंदु समाजातर्फे बांधण्यात येणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदीराच्या विरोधात पराग मेहता (Parag Mehta) यांनी पालिका दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पालिका मुख्याधिकारी समोर पूर्ण झाली असून अंतिम निर्णय मुख्य अधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे.

मुरगाव हिंदू समाजातर्फे धर्मशाळा येथे बांधण्यात येणारे श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याने सदर बांधकाम विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी यासाठी पराग मेहता याने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठासमोर विशेष याचिका दाखल केली होती. सदर याचिका निकाला काढताना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी घेऊन तीन महिन्याच्या आत यावर निर्णय देण्याचा आदेश मुरगाव पालिकेला दिला होता.

त्यानुसार पालिका मुख्याधिकारी जयंत तारी याने आतापर्यंत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पराग मेहता यांनी आपली बाजू स्वतःहून मांडताना सदर बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगितले तसेच सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे आपण पदाधिकारी असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

मुरगाव हिंदू समाजाच्या वतीने आपली बाजू मांडताना प्रसिद्ध वकील ॲड भोबे यांनी सांगितले, की सार्वजनिक विश्वस्त मंडळ हे सर्वांसाठी असून ती मेहता कुटूंबियांची खासगी मालमत्ता नाही. तसेच मंदीर उभारण्यात येणारी जागा मेहता यांची असल्याचा एक सुद्धा पुरावा ते सादर करू शकले नसल्याचे भोबे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मंदीर उभारण्यात येणाऱ्य जागेवर वास्कोतील हिंदू बांधव गेल्या ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उत्सव साजरा करीत आलेले असून यापूर्वीचे बांधकाम मोडकळीस आल्याने नविन बांधकामाला सुरुवात केल्याचे सांगितले. सदर बांधकाम बेकायदेशीर होते तर मेहता यांनी मंदीराचे बांधकाम ५० टक्के पूर्ण होई पर्यंत वाट का पाहीली असा प्रश्न केला. मुरगांव हिंदू समाजातर्फे ॲड भोबे यांच्यासह ॲड राजीव ढवळीकर, ॲड नियोज देसाई व ॲड नमिता मयेकर उपस्थित होत्या तर पराग मेहता यांनी आपली बाजू स्वतः मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT