Goa Crime News |  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: आप्‍त समजून भलत्‍याचे दफन; मृत ठरलेला प्रौढ 2 महिन्‍यांनी परतला घरी

Goa Crime News: आगशीतील घटनेने खळबळ : कुटुंबीयांनाही आश्‍चर्याचा धक्का; मुंबईतील इसमाच्या प्रसंगावधानामुळे प्रकरणाला कलाटणी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मृत्यू झालेला माणूस पुन्हा जीवंत झाल्याचे कथा किंवा चित्रपटात पाहायला मिळते, परंतु तशी प्रत्यक्ष घटना कोणासमोर घडली, तर दरदरून घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. अशीच घटना आगशी येथे घडली असून मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर मिलाग्रीस गोन्साल्विस (वय ५९, मालवारा, आगशी) हे घरी परतले. त्यामुळे सांत आंद्रेसह संपूर्ण गोव्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मिलाग्रीस यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांना निवारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची पत्नी आणि दोन मुली यूकेमध्ये स्थायिक झाली आहेत. हल्लीच ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती.

त्यानंतर 7 ऑक्टोबर पणजी पोलिसांना अज्ञात व्यक्तीचे शव मिळाल्याने मिलाग्रीस कुटुंबीयांना ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले. गोन्साल्विस कुटुंबीयांनी हा मृतदेह मिलाग्रीस असल्याचे ओळखल्यानंतर त्यांच्याकडे शव सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर रितीनुसार अंत्यसंस्कार करून आगशीतील सेंट लॉरेन्स चर्चमध्ये त्यांना दफन करण्यात आले.

मात्र, डिसेंबरमध्ये मुंबईत एका माणसाला मिलाग्रीस आढळले. विचारपूस केल्यानंतर ते गोव्याचे असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या व्यक्तीने लगेच गोवा पोलिसांशी संपर्क साधला. गोवा पोलिसांनी त्वरित सूत्रे हलविल्यानंतर जीवंत स्वरूपात मिलाग्रीस घरी परतल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले, अशी माहिती आगशीचे माजी सरपंच झेवियर ग्रासियस यांनी दिली.

मिलाग्रीस यांना पुन्हा निवारागृहात पाठवण्यात आले आहे. त्यांची पत्नी आणि मुली यूकेला परतली आहेत. या प्रकरणामुळे गोन्साल्विस कुटुंबीयांना बराच मन:स्ताप झाला होता. त्यामुळे त्यांनी याची माहिती कोणालाच दिली नव्हती.

...मग दफन केलेली व्यक्ती कोण?

मिलाग्रीस गोन्साल्विस ही बेपत्ता झालेली व्यक्ती मृत झाली आणि पुन्हा जीवंत झाल्याची गोष्ट आगशी येथे घडल्याने या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अज्ञात व्यक्तीचे शव मिलाग्रीस असेच समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता खरे जीवंत मिलाग्रीस परतल्याने दफन केलेली व्यक्ती कोण? असा प्रश्न लोकांना पडला असून पोलिस याचा शोध घेणार का, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

सरकार-दरबारी कागदोपत्री नोंदी बदलणार

शवविच्छेदन केल्यानंतर मिलाग्रीस गोन्साल्विस यांचे शव कुटुंबीयांना दिले. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असा पोलिसांचा समज होता. त्यामुळे शवविच्छेदन अहवालावर मिलाग्रीस यांंचे नाव आहे. आता खरे मिलाग्रीस जीवंत परतल्याने अहवालावरील नाव बदलण्याची विनंती पोलिसांनी गोमेकॉला केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT