37th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa: अखेर मुहूर्त ठरला; 'या' दिवशी होणार स्पर्धेचे उद्‍घाटन

नॅशनल गेम्स: सोळा दिवसीय स्पर्धेचा 9 नोव्हेंबरला समारोप: क्रीडामंत्री गावडे यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games Goa गोव्यातील नियोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तारखांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. स्पर्धेचे 25 ऑक्टोबरला उद्‍घाटन होईल आणि सोळा दिवसीय स्पर्धेचा नऊ नोव्हेंबर रोजी समारोप होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी रविवारी दिली. त्यामुळे स्पर्धा होण्याबाबतचे प्रश्नचिन्हही दूर झाले.

‘‘स्पर्धेच्या उद्‍घाटनाविषयी आम्हाला पंतप्रधान कार्यालयाने एक निश्चित तारीख पाठविण्यास सांगितले होते. आम्ही 25 ऑक्टोबरला उद्‍घाटनाची तारीख ठरविली आणि संबंधित पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयाशी केला आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) दिल्लीत या प्रकरणी पाठपुरावा केला. स्पर्धेचीसर्व तयारी अंतिम टप्प्यात असून सज्जतेच्या दिशेने आहे,’’ असे क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले. स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याचे संकेत आहेत.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) स्पर्धा तांत्रिक समितीचे प्रमुख अमिताभ शर्मा यांनीही स्पर्धेचे 25 ऑक्टोबरला उद्‍घाटन होण्याबाबत दुजोरा दिला.

‘‘दसरा आणि दिवाळी यामधील कालावधीत स्पर्धेचे आयोजन व्हावे यासाठी आमचे प्रयत्न होते आणि त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे,’’ असे अमिताभ म्हणाले.

बोधचिन्हाचेे अनावरण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे १४ मे रोजी, तर शुभंकर ‘मोगा’चे १८ जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनावरण झाले. दोन्ही वेळेस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पर्धेचे यजमानपद यशस्वी ठरविण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

देशातील सर्वांत मोठी स्पर्धा

1. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात गोव्यातील स्पर्धा सर्वांत मोठी असेल. प्रथमच सर्वाधिक ४३ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

2. गतवर्षी गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३६ खेळ होते. गोव्यातील स्पर्धेत देशभरातील सुमारे ११ हजार ते १२ हजार क्रीडापटूंचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती अमिताभ शर्मा यांनी दिली.

3. गोव्यातील स्पर्धा वारसा जपणारी असेल. स्पर्धेनिमित्त साधनसुविधा तयार होतील. स्पर्धेसाठी खूप पूर्वी तयारी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे आता राज्य सरकार पूर्णपणे सज्ज आहे, असे अमिताभ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT