Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Minister Subhash Phaldesai: ‘ती’ नाणी ठेवणार वस्तुसंग्रहालयात

Minister Subhash Phaldesai: नाण्यांच्‍या माहितीसाठी घेणार तज्ज्ञांची मदत

दैनिक गोमन्तक

Minister Subhash Phaldesai: नानोडा-बांबर (सत्तरी) येथे सापडलेली तांब्याची नाणी राज्य वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत. सरकारकडे ही नाणी सुपूर्द करणारे विष्णू श्रीधर जोशी यांचा ठळकपणे उल्लेख त्यासंदर्भातील फलकावर केला जाईल, असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ही नाणी कोणत्या धातूची आहेत याचा उलगडा व्हायचा आहे. त्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या ही नाणी १६ किंवा १७ व्या शतकातील असावी, असे मानले जात असले तरी नेमकेपणाने या नाण्यांचा कालखंड समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी खाते लवकरच तज्ज्ञांची मदत घेणार आहे.

देशभरात अनेक ठिकाणी अशी नाणी सापडत आहेत. त्या ठिकाणी अशा नाण्यांवर कोणती प्रक्रिया नंतर केली जाते याविषयी माहिती घेण्यात येत आहे. राज्यात नाणी सापडण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याने त्याबाबत काय करावे याचा विचार केला जात आहे.

भूमीत सापडलेल्या सर्व गोष्टींवर सरकारचा अधिकार असतो. ही नाणी किती दुर्मिळ आहेत हे आधी ठरवावे लागेल. त्यानंतर त्या नाण्यांचे मूल्य समजणार आहे. निश्चितपणे इतिहासात दडलेल्या काही गोष्टींवर ही नाणी प्रकाश टाकतील. त्यासाठी इतिहास संशोधकांनी पुढे यायला हवे. सत्तरी हे त्या काळात पोर्तुगीज साम्राज्याचा हिस्सा नसेल आणि पोर्तुगीज नाणी तेथे सापडत असतील तर व्यापाराचे नवे पैलू याविषयक संशोधनातून पुढे येऊ शकतील, असे फळदेसाई म्हणाले.

832 नाण्यांवर क्रॉस

पुरातत्व संचालक डॉ. नीलेश फळदेसाई यांच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगिजांच्या सुरवातीच्या काळातील ही नाणी असावीत. 832 नाण्यांवर क्रॉस व आद्याक्षर आहे. जे राजाचे नाव असू शकते. गोवा ही त्याकाळात पोर्तुगिजांसाठी पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी असल्याने या नाण्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT