HDPE Boats bkyachtdesign.com
गोवा

Goa Police: किनारपट्टी पोलिसांच्या ताफ्यात ‘एचडीपीई’ बोटी

DGP Jaspal Singh: पाच बोटींमुळे किनारपट्टी सुरक्षा अधिक सक्षम होणार

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्‍याच्‍या सुरक्षेशी पोलिस खात्याकडून कुठलीही तडजोड केली जात नाही, असे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले. ते म्हणाल, किनारपट्टी सुरक्षेवरही आम्‍ही भर दिला आहे. किनारपट्टी पोलिसांना पाच ‘एचडीपीई’ बोटी देण्‍यात आल्‍या असून त्‍यामुळे त्‍यांना आता अंतर्गत भागातही गस्‍त घालणे सोपे होणार आहे.

सध्‍या देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. त्‍यासंबंधी पोलिसांना मार्गदर्शन करण्‍यासाठी आज सिंग मडगावात आले होते. त्‍यावेळी पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी ही माहिती दिली. ते म्‍हणाले, पूर्वी गोवा किनारपट्टी पोलिसांकडे मोठी बोट होती. त्‍यामुळे त्‍यांना अंतर्गत भागातील पाण्‍यात जाऊन गस्‍त घालता येत नव्‍हते.

आता त्‍यांना या लहान आकाराच्‍या पण सक्षम अशा ‘एचडीपीई’ बोटी मिळाल्‍या आहेत. त्‍यामुळे आता ते अंतर्गत भागातही गस्‍त घालू शकतील. गुजरात येथील कोस्‍टल सिक्युरिटी अकादमीत प्रशिक्षण दिले गेले आहे. त्‍यामुळे आता किनारपट्टी सुरक्षा अधिक सक्षम झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT