Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : गोव्यात खंडणी मागण्याच्या प्रकारांना मुख्यमंत्र्यांचाच आशिर्वाद? विजय सरदेसाईंचा सवाल

अन्यथा करवाई करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : कळंगुट येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार मायकल लोबो यांनी गोव्यात व्यासायिकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा जो आरोप केला आहे तो गंभीर स्वरूपाचा असून या खंडणी बहाद्दरांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आशिर्वाद आहे का असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

लोबो यांनी जे आरोप केले आहेत त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी अजून कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामूळे या खंडणी बहाद्दरांकडे मुख्यमंत्र्यांची मिलीभगत असल्याचे दिसते. जर लोबो खोटे बोलून गोव्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे नाव खराब करत असतील तर त्यांनी लोबोंवर करवाई करावी. पण जर ते काहीच कारवाई करत नाहीत तर त्यांनाही या खंडणीचा वाटा जातो असे म्हणावे लागेल.

राज्यातील व्यावसायिकाना संरक्षण देणे हे गृहमंत्र्यांचे काम असते. पण त्याऐवजी जर त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जाते तर गोव्यात जंगल राज चालू आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

SCROLL FOR NEXT