CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री खानापूरमध्ये दाखल

खानापुरच्या विकासासाठी भाजपलाच साथ द्या - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी व कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी शनिवारी खानापूरला भेट दिली. यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला.

या दौऱ्यावेळी बोलताना सावंत म्हणाले केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. या सरकारला गोवा राज्याचीही साथ राहणार आहे.

यासाठी खानापूर तालुक्यातील मुख्यत: गोवा भागात रोजगारासाठी असलेल्या तमाम मतदारांनी विठ्ठल हलगेकर यांना मतदान करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्यावा व या भागाचा विकास करण्यासाठी आपले बहुमूल्य मत देऊन निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उमेदवार विठ्ठल हलगेकर सह भाजपा अध्यक्ष संजय कुबल माजी आमदार अरविंद पाटील, बाबुराव देसाई, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, किरण सदानंद पाटील, चेतन मनेरिकर, अशोक देसाई, मंजुळा कापसे सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT