Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Passengers Angry on Kadamba: पणजीला जाणारी बस झाली लेट; मडगाव स्थानकात वैतागले प्रवासी!

कदंबा प्रशासनावर प्रवाशांची तीव्र नाराजी

गोमन्तक डिजिटल टीम

(Passengers Angry on Kadamba At Margao Bus Stand) मडगाव बसस्थानकात पणजीकडे जाणारी बस न आल्याने प्रवासी ताटकळले. तब्बल दीड तास मडगाव ते पणजी बसच नसल्याने प्रवाशांना विनाकारण मानसिक त्रास झाला. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. कदंबा महामंडळ प्रशासनाच्या या गैरव्यवस्थापनावर या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे कदंबा महामंडळ प्रशासनाला याचे काहीही सोयरसूतक नव्हते. प्रवाशांच्या या गैरसोयीबद्दल कदंबा प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. दीड तास वाट पाहून वैतागलेल्या प्रवाशांनी जेव्हा प्रशासनाकडे विचारणा केली, तेव्हा पणजीहून बस आल्यानंतर ती बस सोडली जाईल, असे सांगण्यात आले.

अनेक चाकरमानी कार्यालयीन कामकाज संपवून घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. काही जणांनी ही नेहमीची घरी जाण्याची वेळ होती. या प्रवाशांमध्ये महिला आणि मुलींची संख्याही मोठी होती. जवळपास 70 हून अधिक प्रवासी मडगाव बसस्थानकात कदंबाच्या पणजीला जाणाऱ्या बसची ताटकळत वाट पाहत होते. अनेकांनी राज्य सरकारच्या नावानेही खडे फोडले. जवळपास दीड ते पावणेदोन तास हे प्रवासी पणजी बसची वाट पाहत होते. संतप्त झालेल्या प्रवाशांमुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT