पैकुळचा पुल बारा महिन्यात पूर्ण होणार, पाणी पुरवठ्यासाठीही प्रयत्न: मंत्री राणे Dainik Gomantak
गोवा

पैकुळचा पुल बारा महिन्यात पूर्ण होणार, पाणी पुरवठ्यासाठीही प्रयत्न: मंत्री राणे

सत्तरी (Satari) तालुक्यातील पैकुळ (Paikul) गावचा पुल पुरावेळी मोडून पडला होता. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटलेला आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई - सत्तरी (Satari) तालुक्यातील पैकुळ (Paikul) गावचा पुल पुरावेळी मोडून पडला होता. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटलेला आहे. सरकारच्या जलस्त्रोत विभागाने पर्याय म्हणून बंधार्यांवर फळ्या घालून लोकांना ये जा करता येईल अशी सोय केली आहे. तसेच जंगली जुन्या मार्गाने वाट केली आहे. पण दोन्ही पर्याय धोक्याचे आहे. त्यावरुन काल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकांनी वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन पंधरा दिवसात समस्या सोडविण्याचे आवाहन केले होते. त्यावरुन आता आरोग्यमंत्री (health minister) विश्वजीत राणेंनी (Vishwajit Pratapsingh Rane) आज तातडीची बैठक रस्ता विभाग, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारीं सोबत बैठक घेतली आहे. समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्काळ हालचाली केल्या जाणार असल्याचे बैठकीतून निष्पन्न झाले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी सांगितले पैकुळचा पुल येत्या नऊ ते बारा महिन्यात पुर्ण होऊन पुन्हा वाहतुकीसाठी लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी साडेसात कोटी खर्च होता. तो आता साडेबारा कोटी पर्यंत होणार आहे. त्या कामाची निविदाही येत्या आठवड्यात काढली जाणार आहे. पैकुळ बरोबरच सावर्डे गावचा अरुंद पुलही रुंद बांधला जाणार आहे. त्या सावर्डे पुलालाही प्राधान्य दिले जाईल. पैकुळ व परिसरातील लोकांनी पाणी पुरवठ्यासाठी पाहिजे तेवढे टँक्करने पाण्याची सोय केली जाते आहे. ती सुरुच राहणार आहे असे राणे म्हणाले. यावेळी गुळेली ग्रामपंचायतीचे पंचायत मंडळ उपस्थित होते.

यावेळी गुळेली ग्रामपंचायतीचे पंचायत मंडळ उपस्थित होते. यावेळी गुळेली पंचायतीच्या अस्मिता मेळेकर, अन्य पंच सदस्य, विठ्ठल कासकर, जीएसआयडीसीचे अधिकारी दिलीप जोशी, श्रीपाद वालावलीकर, विश्रांती च्यारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी.एस. गुप्ता, झीलबाराव देसाई, चंदन नाईक, अरविंद सावईकर, आदींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT