Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : म्हापशात पुरलेल्या स्थितीत आढळला चिमुकल्याचा मृतदेह तर पेडणेत सापडला मानवी सांगाडा

पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी पाठवला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Crime : मरड-म्हापसा येथे पडीक शेतात पुरलेल्या स्थितीत दीड वर्षीय बाळाचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाकडून येथील शेतात गवताला लागलेली आग विझविताना आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

चौकशीअंती म्हापसा पोलिसांनी सांगितले, की फुगे व इतर साहित्य विकणारे मुंबईस्थित हे परप्रांतीय कुटूंब कार्निव्हलसाठी गोव्यात आले होते. म्हापसा बसस्टॅण्डच्या शेजारी झोपडपट्टीत ते राहत होते.

पाच दिवसांपूर्वी त्यांचा चिमुकला खोकला व सर्दीने मृत पावला. त्यावर या कुटुंबाने हा मृतदेह मरड येथील पडिक शेतात विधीवत पुरला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी पाठवला असून प्रथमदर्शनी काहीही संशयास्पद नसल्याचे सांगितले.

तोर्से डोंगरावर सापडला मानवी सांगाडा

पेडणे तोर्से येथे सरकारी हायस्कूलच्या मागे डोंगरावर आज एक मानवी हाडांचा सापळा सापडला. काजू बागायतीत गेलेल्या लोकांना हा सांगाडा दिसल्यावर त्याची माहिती त्यांनी मोपा पोलिसांना दिली.

तपासाअंती असे समजले, की हा सांगाडा अक्षय वल्लभ फाटक (25) याचा आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयानी 30 नोव्हेंबर 22 रोजी मोपा पोलिसांत दिली होती. बेरोजगारीमुळे उच्चशिक्षित अक्षय मानसिक नैराश्‍यात होता. सांगाड्याजवळ सापडलेल्या वस्तूच्या आधारे कुटुंबीयांनी ओळख पटवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT