Goa Crime Cases Dainik Gomantak
गोवा

Corgao: कोरगाव येथील पोलिस सहाय्यक उपनिरिक्षकाचा मृतदेह आढळला; शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांच लक्ष

तुये फेरीबोट धक्क्याजवळ आढळला मृतदेह

दैनिक गोमंतक

सहाय्यक उपनिरिक्षक तसेच कोरगाव येथील रहिवासी साबाजी ( महेश ) देसाई हे 26 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. गेले काही दिवस त्यांचा शोध लागत न्हवता. आज मात्र देसाई यांचा शोध लागला असून शापोरा येथील नदीत तुये फेरीबोट धक्क्याजवळ त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला आहे.

(The body of Assistant Sub-Inspector Sabaji Desai of Corgao has been found)

पेडणे पोलिसांनी मृतदेह पंचानामा करत ताब्यात घेतला आहे. व उत्तरिय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महा विद्यालयाच्या इस्पितळात पाठवला आहे. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा असून त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

मृत देसाई त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, चार भाऊ असा परिवार आहे. पेडणे पोलीस स्थानकातील हवालदार गुरुनाथ देसाई व माजी पंचायत सदस्य वसंत देसाई यांचे ते वडील बंधु होत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT