file photo Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वीज विभागातील कर्मचाऱ्याचा नदीत आढळला मृतदेह; मीराबाग-सावर्डेतील घटना

आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: गोव्यातील मीराबाग-सावर्डे येथील नदीत वीज विभागातील कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. संतोष शिरोडकर (वय ४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो वीज विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. शिरोडकर हा मूळचा कुडचडे येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीराबाग-सावर्डे येथील नदीत हा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाने संयुक्त प्रयत्नांतून हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते. ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT