भूमिपुत्र विधेयक राज्यपालांच्या समंतीस पाठवणार नाही: मुख्यमंत्री Dainik Gomantak
गोवा

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांच्या संमतीस पाठवणार नाही: मुख्यमंत्री

प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी असे सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे सध्या अभ्यासाठी कायदा खात्याकडे असून ते राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविले जाणार नाही असे ठोस आश्‍वासन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिले. या विधेयकासंदर्भात महसूलमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात संभ्रम निर्माण करणारा असल्याने आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण मागितले.

अधिवेशनापूर्वी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक तूर्त विधानसभेत मांडण्यात येणार नसल्याची माहिती दिली गेली होती. मात्र महसूलमंत्र्यांनी दिलेल्या एका प्रश्‍नावरील उत्तरात हे विधेयक सध्या कायदा खात्याकडे आहे.

ते पाठवले जाणार का याबाबत स्पष्टीकरण केलेले नसल्याचे आमदार सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या विधेयकाची सद्यस्थिती काय आहे. ते विधेयक रद्द झाले का ते कायदा खात्याकडे प्रलंबित आहे त्याचा उलगडा सरकारने करावा असी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकर गोव्यात बांधणार स्वतःचं हक्काचं घर, लाडक्या अभिनेत्याची मोठी घोषणा; गोमंतकीयांना दिलं खास सरप्राईज

EPFO New Rule: नोकरी सोडली तरी पीएफवर व्याज मिळतो? ईपीएफओच्या 'या' नियमामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

T20 World Cup 2026: "आमचा संघ खूप स्ट्रॉंग..." डोनाल्ड ट्रम्प यांची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री; टीम USAला शुभेच्छा देणारा मेसेज व्हायरल

Indis vs Pakistan: 'पैसे द्या तरच खेळू!' भारतासोबत भिडण्यासाठी पाकड्यांच्या 3 अटी, 'ICC'ची डोकेदुखी वाढली

Shirgao Accident: मध्यरात्री स्कुटरवरचा ताबा सुटला, गटारात पडून तरुण मृत्‍युमुखी; पहा Video

SCROLL FOR NEXT