Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality Election 2023: फोंडा पालिका प्रभाग फेररचनेसह आरक्षणविरोधी याचिका खंडपीठाने फेटाळली

माजी उपनगराध्यक्ष विन्सेंट पॉल फर्नांडिस यांच्यासह इतर चौघांनी ही याचिका सादर केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipality Election 2023: फोंडा पालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग फेररचना व आरक्षणाला आव्हान दिलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज फेटाळली.

माजी उपनगराध्यक्ष विन्सेंट पॉल फर्नांडिस यांच्यासह इतर चौघांनी ही याचिका सादर केली होती. तसेच साखळी पालिकेच्या प्रभाग फेररचना व आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिकेवर उद्या (१२ एप्रिल) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

फोंडा व साखळी पालिकेचा कार्यकाळ 20 मे रोजी संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने या दोन्ही पालिका प्रभागांची फेररचना व आरक्षण जाहीर केले आहे.

या फेररचनेला हरकतीचा अर्ज सादर केला होता. त्या अर्जाची दखल न घेताच काही त्रोटक बदल करून मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे, असा मुद्दा याचिकादारांच्या वकिलांनी मांडला.

याचिकेत नोंदवलेले आक्षेप

  • आयोगाने जाहीर केलेल्या प्रभागांना समान निकष लावलेले नाहीत.

  • काही प्रभाग सलग तीनवेळा आरक्षित, तर काही प्रभाग सलग खुले ठेवले आहेत.

  • प्रभाग फेररचना करताना नियम व निकषांना फाटा दिला आहे.

  • किमान सात प्रभागांमध्ये मतदार यादीत फेररचना करताना भौगोलिक निकष लावलेले नाहीत.

  • पूर्वी एकाच प्रभागात असलेली काही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करून विभागणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT