Atisha Dainik Gomantak
गोवा

'देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हेच आपचे उद्दिष्ट'

आतापर्यंत घरातील पुरुषांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या देशातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवणे हे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) ध्येय आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरातील महिला (Women) आर्थिकदृष्ट्या सबल होणे आज काळाची गरज आहे. आतापर्यंत घरातील पुरुषांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या देशातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवणे हे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) ध्येय आहे. आपचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्यासाठी सर्वतोपरिने प्रयत्नशील आहेत. गोव्यातील महिलांना ग्रुह आधार योजनेखाली मिळणारी दीड हजार रुपयांची रक्कम वाढवून ती दुप्पट करण्याचा आपचा निर्धार असून घरातील प्रत्येक अठरा वर्षावरील महिलांना दरमहा हजारभर रुपयांची मदत मिळवून देण्यास पक्ष बांधील असल्याचे आम आदमी पक्षाच्या दिल्रीच्या आमदार तथा गोव राज्य निवडणूक प्रभारी आतीशा (Atisha) यांनी कळंगुटात सांगितले. 

आम आदमी पक्षाच्या कळंगुट मतदार संघ महिला सबलीकरण योजनेखाली शुक्रवार पासून सुरु करण्यात आलेल्या छोटेखानी प्रशिक्षण शिबीराचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी आपचे स्थानिक नेते तथा कळंगुट मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुदेश मयेंकर, तसेच गॉडवीन फर्नाडीस आदी मान्यवर उपस्थित होते. शुक्रवार 10 डिसेंबर पासून सुरु करण्यात।येत असलेले सदर कोर्सेस 19 डिसेंबर पर्यत सुरू राहाणार आहेत. दरम्यान, महिलांसाठीच्या दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणार्या वस्तुंची निर्मीती करण्याचे प्रशिक्षण या शिबीरात दिले जाणार असून या शिबीराचा स्थानिक महिलांनी अधिकाधिक उपयोग करून घेण्याचे आवाहन यावेळी सुदेश मयेंकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT