Utpal Parrikar vs Babush Monserratte in Panaji constituency Dainik Gomantak
गोवा

..म्हणून लागलंय पणजी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

'मोन्सेरात हे आता भाजप पक्षाचे उमेदवार असले तरी त्यांना धक्का बसला आहे'

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाची नजर राज्याची राजधानी पणजीकडे लागली आहे. 25 वर्षे (1994-2019) हा मतदारसंघ भाजप आणि मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात राहिला. 2019 मध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूने, मोन्सेरात यांच्या माध्यमातून काँग्रेसने हा मतदारसंघ काबिज केला. मोन्सेरात हे आता भाजप पक्षाचे उमेदवार असले तरी त्यांना धक्का बसला आहे. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा मुलगा उत्पल याने तिकिटासाठी दावा केला आणि वडिलांचा वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहे अस पक्षाला सांगितल. मात्र त्यांना तिकीट दिले नाही. बंडखोरी करून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते पूर्ण ताकतीने उतरले आहेत.

ज्या मतदारसंघात त्यांचे वडील जवळपास 25 वर्षे आमदार होते, त्या मतदारसंघात बंडखोरी करून भाजपच्या (BJP) ताकदीचा सामना करण्याच्या उत्पलच्या निर्णयाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसने देखील आपला या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे, परंतु या मतदारसंघात विद्यमान आमदार (MLA) मोन्सेरात आणि उत्पल यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. मोन्सेरात हे अनुभवी राजकारणी आहेत. ताळगाव (2002, 2007), सांताक्रूझ (2012) आणि पणजी (2019) या तीन भिन्न मतदारसंघांतून त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांच्या "मदतीच्या स्वभावामुळे" मतदारांच्या एका वर्गात लोकप्रियता आहे. उत्पल पदार्पण करत आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT