Sankhalim News Dainik Gomantak
गोवा

Sankhalim News: साखळीत हातगाडा हटवताना तणाव; पालिका पर्यवेक्षक, कर्मचारी यांच्यात वाद

कारवाई सुरू असताना मोठा गोंधळ

दैनिक गोमन्तक

Sankhalim News: गोकुळवाडी साखळी येथील मल्टिपर्पज क्रीडा प्रकल्पाच्या बाहेर रस्त्याबाजूला व्यवसाय करणारा एक हातगाडा साखळी नगरपालिकेकडून हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना मोठा गोंधळ निर्माण झाला.

स्थानिक नगरसेवक ब्रह्मांनंद देसाई यांनी या कारवाईस विरोध करत गाडा हटविण्यास हस्तक्षेप केला. यावेळी नगरसेवक देसाई व पालिका पर्यवेक्षक, कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला.

गोकुळवाडी येथील मल्टिपर्पज क्रीडा प्रकल्पाच्या बाहेर गेल्या अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी व्यवसाय करत आहे.

गेल्याच काही दिवसांपूर्वी सदर गाडा मालक महादेव गावकर यांनी जुना हातगाडा हटवून त्याठिकाणी नवीन पत्र्याचा गाडा तयार करून बसविला व त्यात चिकन शोरमाचा व्यवसाय सुरू केला. मागील दोनच दिवस हा गाडा येथे चालल्यानंतर साखळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तो हटविण्याचा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT