Goa ST Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: गोव्यात एसटी आरक्षणावरून तणाव; मडकईकर म्‍हणतात, बहिष्काराचा निर्णय नव्‍हताच!

अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa ST Reservation: अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न जरूर सुरू आहेत. दक्षिण गोव्यात झालेल्या संघटनेच्या सभेत लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा केवळ प्रस्ताव होता; कोणताच निर्णय झालेला नव्हता, असा दावा भाजपच्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर यांनी आज केला.

तर बहिष्कार घालण्याचा ठराव एकमुखी घेण्‍यात आला होता, मडकईकर खोटे बोलत आहेत, असा आरोप ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’चे अध्यक्ष ॲड. जुआव फर्नांडिस यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच दक्षिण गोव्‍यात झालेल्‍या सभेत ‘एसटी’ना राजकीय आरक्षण न मिळाल्‍यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्‍कार टाकण्‍यात येईल, असा इशारा देण्‍यात आला होता. मात्र, शहा यांच्‍या सभेत मुख्‍यमंत्र्यांनी 2027 पूर्वी एसटी आरक्षण मार्गी लागेल, असा पुनरुच्‍चार केला. त्‍यानंतर आज भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर यांनी पत्रकार परिषद घेत अप्रत्‍यक्षरीत्‍या ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’शी फारकत घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. राजकीय जाणकार ही फूट मानत आहेत. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर देखील उपस्थित होते.

मडकईकर म्हणाले, 2027च्‍या विधानसभा निवडणुकीत चार जागांवर एसटींना आरक्षण मिळावे, यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याकामी प्रयत्नशील असल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची गरज नाही.

धाकू खोटे बोलतात : ॲड. फर्नांडिस

गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण लोकसभा निवडणुकीपर्यंत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा जो ठराव घेण्यात आला होता, तो एकमुखी होता आणि तो ठराव घेताना धाकू मडकईकरही उपस्‍थित होते, असा खुलासा मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनचे अध्यक्ष ॲड. जुआव फर्नांडिस यांनी केला. ‘धाकू आता खोटे बोलत आहेत. कदाचित त्यांच्यावर पक्षाकडून दबाव आला असेल.

मात्र, हा ठराव घेतला तेव्हा ते तिथे उपस्थित होते आणि त्यांनी या ठरावाला विरोध केला नव्हता. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ पुरावे आहेत’, असे ॲड. फर्नांडिस यांनी सांगितले. या बैठकीला सुरेश केपेकर हे गैरहजर होते, असा मडकईकर दावा करतात, तोही खोटा आहे. मात्र ज्यावेळी हा ठराव घेतला त्यावेळी ते सभागृहात नव्हते, असेही ते म्हणाले. भाजप पक्षाला कदाचित या आंदोलनातून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा असेल. त्यासाठीच ते समाज बांधवांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप ॲड. फर्नांडिस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT