Tension During Bicholim Shigmo Parade 
गोवा

Bicholim Shigmo: डिचोली शगमोत्सवात वाद; सादरीकरणास मज्जाव केल्याने गोंधळ, चंद्रकांत शेट्येंची मध्यस्थी

Tension During Bicholim Shigmo Parade: वादात अखेर डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

Pramod Yadav

Tension During Bicholim Shigmo Parade

डिचोली येथे शिगमोत्सव शोभायात्रेदरम्यान वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. बार्देश शिगमोत्सव समितीला सादरीकरण करण्यास मज्जाव केल्याने गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री १२ ते उशीरा दीड वाजेपर्यंत हा वाद सुरु असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वादात अखेर डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

समितीच्या सदस्यासोबत झटापट

बार्देश शिगमोत्सव समितीला सादरीकरण करण्यास रोखल्यानंतर, समितीमधील सदस्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. डिचोली शिगमोत्सव समितीमधील सदस्यांनी त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, या सदस्यासोबत झटापट झाली. बराचवेळा दोन्ही समितीच्या सदस्यांमध्ये शाब्दीक वाद सुरु होता. याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

वाद शिगेला गेल्यानंतर स्थानिक आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी मध्यस्थी करत, काही तक्रार असल्यास रितसर पोलिस स्थानकांत दाखल करावी. पोलिसांना याप्रकरणात लक्ष घाण्याची मी विनंती करतो असे, शेट्ये म्हणाले.

रोमटामेळ येण्यास वेळ झाल्याने शोभायात्रेला थोडा उशीर झाले. दरम्यान, बार्देश समितीचा मेळ पोलिसांना बंद केल्याची माहिती समोर आली, याचा त्यांना राग. इतरांचे मेळ सुरु असताना आमचाच बंद का केला? असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला, अशी माहिती आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.

उशीरा रात्री एकच्या सुमारा ही घटना घडली, किरकोळ गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे देखील शेट्ये म्हणाले.

डिचोली समितीवर आरोप

डिचोली समितीवर बार्देश शिगमोत्सव समितीने पारर्दशकतेवरुन आरोप केले. बार्देश समिती सादरीकरण करत असताना त्यांना रोखण्यात आले. इतर मेळ सुरु असताना आमचे बंद का केले? असा आरोप सदस्यांनी केला. बार्देश समितीवर अन्याय झाल्याचे आरोप करत पुढील बार्देश समितीने शिगमोत्सव आयोजित करु नये केल्यास जिंकून आलेल्यांनाच आमंत्रण द्यावे असे सदस्य म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: बाबर आझमच्या दांड्या गुल! अक्षर पटेलनं घेतला विकेट

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

SCROLL FOR NEXT