Goa Weather Dainik Gomantak
गोवा

पुढील 3 दिवसात होणार तापमानात वाढ

11 मार्चला उत्तर आणि दक्षिण गोव्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि 40 किमी ताशी वारे वाहण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

Temperature Rise in Goa: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यातच वेधशाळेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. गोव्यात केरी-सत्तरी भागात जवळजवळ अर्धा तास पाऊस पडला होता.

पुढील काही दिवसात हवामानात बदल होणार असून IMDने याबद्दलची माहिती दिली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील 3 दिवसात कमाल तापमानात (Temperature) सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मुळातच सध्या उकाडा जास्त आहे त्यात पुनः या तापमान वाढीमुळे गोवेकर हैराण होण्याची शक्यता आहे.

11 मार्चला उत्तर आणि दक्षिण गोव्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि 40 किमी ताशी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आणखी 2 दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस सुरू राहणार आहे.

हवामानातील या बदलामुळे राज्यात बाहेर पडणे लोक टाळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT