Vishwajit Rane And CM pramod Sawant announce Telemedicine service for Goa citizens Dainik Gomantak
गोवा

Goa: 2 ऑक्टोबरपासून गोवेकरांसाठी टेलिमेडिसिन सेवा सुरू

टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक डॉक्टरांना फोन करून घरी वैद्यकीय उपचार मिळवू शकतील.

दैनिक गोमन्तक

फोंडा: गोवा सरकार (Goa Government) 2 ऑक्टोबरपासून गोवेकरांसाठी (Goa) टेलिमेडिसिन (Telemedicine) सेवा सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी काल रविवारी केली. बेतकी येथील 25 खाटांच्या (primary health center) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणा/पुनर्बांधणीसाठी पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात डॉक्टरांना फोन करून घरी वैद्यकीय उपचार मिळवू शकतील. हे डॉक्टर रूग्णालयातूनच रुग्णांना सल्ला देतील, औषधे सुचवतील आणि आपत्कालीन काळात उपचारही देतील. गरज पडली तर डॉक्टर त्यांना रुग्णालयातही बोलवतील, असे सावंत यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी या योजनेवर चर्चा केली आहे. 50 टक्के रुग्ण येणे टाळतात. मात्र काही लोकं अगदी साध्या आजारांसाठीही जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) भेट देतात. त्यामुळे सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 महामारी अजूनही संपलेली नाही कारण अजूनही गंभीर प्रकरणांची नोंद केली जात आहे. सरकार तिसऱ्या लाटेला थांबविण्याची तयारी करत आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

वचन दिल्याप्रमाणे सरकार राज्यातील प्रत्येक घराला 16000 लिटर मोफत पाणी दर महिन्याला देणार आहे. राज्य आणि तेथील लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार पाऊलं उचलत आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

सरकार आपल्या लोकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहे. गोव्याने कोविड रुग्णांच्या उपचारावर जवळपास 1 लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, कॉर्टलीमच्या आमदार अलिना सालदान्हा, म्हापसाचे आमदार आणि जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष जोशुआ डिसूझा, पंचा आणि जीएसआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT