Sonali Phogat Murder case Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : सोनालींचा मृत्यू ‘कर्लिस’मध्येच झाला का? चौकशी सुरू

ज्या टॅक्सीतून सोनालींना कर्लिस शॅकमधून रिसॉर्टवर नेण्यात आले; त्या टॅक्सीचालकाची जबानी सीबीआयकडूनही नोंदविली जाण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : वादग्रस्त कर्लिस शॅकमध्ये सोनाली फोगट या बेशुद्धावस्थेत होत्या की त्यांचा तेथेच त्या रात्री मृत्यू झाला होता, याची माहिती सीबीआय मिळवत आहे. कर्लिसमधून त्यांना बेशुद्धावस्थेतच त्या वास्तव्यास असलेल्या द ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये टॅक्सीने नेण्यात आले.

रिसॉर्टमध्ये त्या शुद्धीवर न आल्याने त्यांना हणजूण येथील इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. ज्या टॅक्सीतून सोनालींना कर्लिस शॅकमधून रिसॉर्टवर नेण्यात आले; त्या टॅक्सीचालकाची जबानी सीबीआयकडूनही नोंदविली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या टॅक्सीचालकाची जबानी नोंदविली आहे. कर्लिस शॅकमध्ये ड्रग्ज सापडल्याने एडविन नुनीस याचीही सीबीआयने चौकशी केल्याने या खुनाच्या प्रकरणात अडकले जाण्याच्या भीतीने त्याचे धाबे दणाणले आहे.

सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सीबीआय पथकाने काल रविवारी फॉरेन्सिक तज्ज्ञ अधिकाऱ्यांसह हणजूण येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटला भेट दिली. तेथे सोनाली बेशुद्धावस्थेत होत्या, त्या जागेची कसून पाहणी केली. ‘कर्लिसॅचा चालक एडविन नुनीस व काही कर्मचाऱ्यांची चौकशी करत जबानी नोंदवल्या. यानंतर पथकाने पुन्हा द ग्रँड लिओनी रिसॉर्टवर जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासप्रक्रिया सुरू केली.

सीबीआयने शनिवारी दिवसभर ‘लिओनी’ रिसॉर्टमध्ये सोनाली तसेच सांगवान व सुखविंदर सिंग वास्तव्यास असलेल्या 3 खोल्यांची बारकाईने तपासत सील केल्या. त्यानंतर काल रविवारी सकाळी पथकाने ‘कर्लिस’कडे मोर्चा वळविला. दोन तास या शॅकच्या शौचालयात ज्या ठिकाणी सोनाली या बेशुद्धावस्थेत पडून होत्या त्या जागेची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT