Goa News 
गोवा

पुस्तकाचे पान फाडले म्हणून शिक्षिकेकडून 9 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, रिक्षाचालक वडिलांनी दाखल केली तक्रार

Goa News: शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत मुलाच्या हातावर वळ उठले आहेत. तर, त्याला जखम देखील झाली आहे. यावरुन नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

बार्देश: कामुर्ली भागातील एका प्राथमिक शाळेत शिक्षा देण्याच्या हेतूने शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलाच्या रिक्षाचालक वडिलांनी कोलवाळ पोलिसांत दाखल केली असून, पुस्तकाचे पान फाडले म्हणून त्याला शिक्षा देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्मुर्ली भागातील प्राथमिक शाळेत नऊ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांने पुस्तकाचे पान फाडल्याने शिक्षिकेने शिक्षा दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत मुलाच्या हातावर वळ उठले आहेत. तर, त्याला जखम देखील झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या वडिलांनी याप्रकरणी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलगा नऊ वर्षांचा असून, त्याच्या अंगावर वळ पडले, असा दावा पालकांनी केला आहे. त्या संदर्भात छायाचित्रेही पोलिसांना सादर करण्यात आली आहेत.

पीडित मुलाचे वडील हे रिक्षाचालक आहेत. अशा पद्धतीने शिक्षा देणे अयोग्य आहे. आपल्याला न्याय द्या, अशी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. लहान विद्यार्थ्याला अशाप्रकारे मारहाण करणे चुकीचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT