Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: एलडीसी नोकरीचं आमिष दाखवून शिक्षकाने घातला 40 लाखांना गंडा; फोंडा पोलिसांकडून तक्रार दाखल!

LDC Job: फोंडा येथून अशीच फसवणूकीची घटना समोर आली आहे. खुद्द शिक्षकानेच शिक्षण खात्यात एलडीसी नोकरीचे आमिष दाखवून 40 लाखांचा गंडा घातला.

Manish Jadhav

फोंडा: राज्यात सध्या सरकारी नोकरी घोटाळ्यावरुन वादंग माजला आहे. पूजा, दिपक्षी, दिव्या या महिलांनी कोट्यवधींचा गंडा घातल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याचदरम्यान फोंडा येथून अशीच फसवणूकीची घटना समोर आली आहे. खुद्द शिक्षकानेच शिक्षण खात्यात एलडीसी नोकरीचे आमिष दाखवून 40 लाखांचा गंडा घातला.

फोंडा पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करतायेत. दुसरीकडे, राज्यात सरकारी नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही तापलं आहे. विरोधक सातत्याने सत्ताधारी सावंत सरकारला निशाण्यावर घेत आहेत. या प्रकरणाची तात्काळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्यात अशी विरोधकांकडून मागणी केली जात आहे. मात्र, पोलिसच या प्रकरणाचा छडा लावतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

दीपक्षी सावंतचे कारनामे

दुसरीकडे, दीपश्री सावंत गावस हिचे एक एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. नोकरीसाठी लोकांकडून उकळलेल्या लाखो रुपयांतून तिने स्वत:चे उखळ पांढरे करतानाच मुक्त हस्ताने देवधर्मही केलाय. गावातील देवीला दागिना अर्पण करतानाच तिने वारकरी मंडळालाही देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे. सरकारी नोकरीसाठी अनेकांना लाखो रुपयांना टोपी घालणाऱ्या दीपश्रीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. दीपश्रीच्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची पाळेमुळे डिचोलीपर्यंत पोहोचली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही अटक

दोन वर्षांपूर्वी दीपश्रीला एका फसवणूक प्रकरणात डिचोली पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटका होण्यापूर्वी तिने एक रात्र पोलिस कोठडीची हवाही खाल्ली होती, अशी माहिती मिळाली आहे. डिचोली तालुक्यातील सर्वण हे दीपश्रीचे माहेर असले, तरी प्रेमविवाह झाल्यानंतर तिचे माहेरशी संबंध काहीसे दुरावले होते. मात्र, अधूनमधून ती डिचोलीत येत होती, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT