Taxi Meter  Dainik Gomantak
गोवा

टॅक्सीचे मीटर अद्याप ‘अप’

पर्यटकांकडून जास्‍त शुल्क आकरण्याच्या तक्रारी वाढल्या

दैनिक गोमन्तक

पणजी : पूर्वी टॅक्सीमध्ये मीटर ‘डाऊन’ करणे म्हणजे तो सुरू व्हायचा अशी प्रणाली होती, परंतु राज्यातील टॅक्सींमध्ये डिजिटल मीटर बसवले असले, तरी ते वापरले जात नसल्याच्या तक्रारी वाहतूक मंत्र्यांपर्यंत पोहोचल्‍या आहेत. पर्यटकांकडून जास्‍त शुल्क आकरण्याचे प्रकार घडत असून राज्‍याची छवी मलीन होत आहे. मीटर वापरण्यास सुरवात केली नाही, तर कारवाई करणारच, परंतु त्या खेरीज ओला आणि उबर(Uber) या ॲप आधिरित टॅक्सी सेवा आणण्याचा विचार करणार असल्याचा इशारा गुदिन्हो यांनी दिला आहे.

गोव्यातील टॅक्सी शुल्क हे देशातच नव्हे, तर जगातील सर्वात महाग टॅक्सी शुल्क असलेल्या शहरांच्या यादीत येते. न्यूयॉर्क(New York) शहरात टॅक्सी शुल्क खूप महाग असल्याचे सांगिले जाते, त्याची तुलना येथील शुल्काबरोबर विदेशी पर्यटकांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील टॅक्सींमध्ये डिजिटल मीटर बसवण्याचा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने दिला होता. सरकारने न्यायालयाच्या आदेशाची अंमबजावणी करून त्यांना मुफ्त डिजिटल बसवले आहे. ज्यांनी आपल्या पैशांनी घेतले होते, त्यांना पैसे परत केले जात आहे. तरी देखील टॅक्सी (Taxi) शुल्कावरून तक्रारी संपण्याचे नाव घेत नाही.

राज्‍यात ॲप(APP) आधारित टॅक्सी सेवा यावे अशी मागणी पर्यटन उद्योगातील भागीदार करत आहे. त्यात आघाडीवर गोवा प्रवास आणि पर्यटन संघटन (टीटीएजी) आहे. गोवा हे देशातच नव्हे, तर जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, परंतु येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योग्य नसल्याने पर्यटकांना त्रास होत आहे. यासाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी भागीदारांकडून केली जात आहे. तसेच हवाई मार्गे राज्‍यात परतणाऱ्या गोमंतकीयांकडूनही अतिरिक्त टॅक्सी शुल्क आकारण्यावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येचे निवारण डिजिटल टॅक्सी मीटर होते. मात्र, मीटरचा वापर होत नसल्याने ही समस्या कायम आहे.

दुसरीकडे टॅक्सी संघटनांनी डिजिटल मीटरमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच अनेकांना अजूनही पैसे देखील न मिळाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ॲप आधारित टॅक्सी सेवेला टॅक्सी संघटनांचा विरोधही कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

SCROLL FOR NEXT