Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

दोन महिने उलटले, मोपावर विमाने येताहेत पण, टॅक्सी सेवेची बोंबाबोंब कायम, त्रस्त प्रवाशी म्हणाले...

11 डिसेंबर 2022 रोजी मोदींच्या हस्ते उद्धाटन झाल्यानंतर, 05 जानेवारी रोजी विमानतळ कार्यान्वित झाले.

Pramod Yadav

उत्तर गोव्यात नव्याने उभारण्यात आलेले मोपा येथील मनोहर विमानतळ सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. 11 डिसेंबर 2022 रोजी मोदींच्या हस्ते उद्धाटन झाल्यानंतर, 05 जानेवारी रोजी विमानतळ कार्यान्वित झाले.

मोपा विमानतळावर मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, नागपूर, चेन्नई आणि इतर शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू झाली आहे. विमानसेवा सुरळीत सुरू असली तरी, विमानाने येणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी व बस हा विषय डोकेदुखी ठरत आहे.

गोवा सरकारसाठी मोपा विमानतळ हा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. पण, दोन महिन्यानंतर देखील विमानतळावरील टॅक्सीची समस्या सुटण्याचे काही नाव घेत आहे. दिल्लीतून गोव्यात सुट्टीसाठी आलेली एक महिला मनोहर विमानतळावर वेळेत उतरली खरी पण, हणजुणे येथे जाण्यासाठी महिलेला तब्बल दोन तास टॅक्सीची वाट पाहावी लागली. या महिलेसोबत दोन वर्षांचा तिचा मुलगा देखील होता. बराचवेळ विमानतळावर टॅक्सीच उपलब्ध नसल्याचे महिलेने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

अशाचप्रकारे बंगळुरू येथून आलेल्या एका महिलेला देखील मोपा येथून मोरजी येथील हॉटेलवरती जायचे होते. 'विमानतळावर तीन तास कॅबसाठी थांबलो, टॅक्सी उपलब्ध नसल्याने एका स्थानिक कार चालकाला बोलवून आम्ही मोरजी गाठली. बेंगळुरू ते गोवा फ्लाइटसाठी जेवढा वेळ लागला नाही तेवढा वेळ आम्हाला मोपा ते मोरजी प्रवासाला लागला.' असे या महिलेने म्हटले आहे.

गोव्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांनी मोपा येथील टॅक्सी समस्येबाबत आपली व्यथा मांडली आहे. टॅक्सीसाठी विमानतळाबाहेर अनेक तास वाट पाहावी लागते. टॅक्सी बूथवर चौकशी करण्यापासून ते अॅप डाऊनलोड करण्यापर्यंत सिस्टीममध्ये अनेक त्रुटी आहेत. असे पर्यटक सांगतात.

विशेष म्हणजे, विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित असताना फार कमी कारचालक मोपाला जातात. मोपा विमानतळ निर्जन आहे, याठिकाणी पार्किंग शुल्क जास्त आहे. आम्हाला पिक-अपसाठी कॉल येतात, पण ड्रायव्हर तिकडे जाण्यास टाळाटाळ करतात. फ्लाइटसाठी वाट पाहावी लागते त्यामुळे अर्थातच पार्किंग शुल्क जास्त द्यावे लागते. असे टॅक्सी चालक म्हणतात.

रेंट-ए-कॅब हा पर्याय आहे. पण, चार दिवसांसाठी कॅब भाड्याने घेणे खूप महाग आहे. त्यासाठी सुमारे 18,000 रुपये मोजावे लागतात. बहुतेक गाड्या महागड्या असल्याने पर्यटक त्या भाड्याने घेण्यास टाळाटाळ करतात. असे पर्यटक सांगतात.

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) च्या बसेस विशिष्ट मार्गांवर धावत असतात. त्या प्रत्येकवेळी मिळतीलच असे नाही. भौगोलिकदृष्ट्या गोवा लहान असला तरी, येथे बस मार्ग शोधणे अवघड आणि त्रासदायक आहे. अशात तुम्ही राज्यात नवीन किंवा सुट्टीवर असाल तर ते अधिक त्रासदायक ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT