GMC  Dainik Gomantak
गोवा

Goa GMC: कोलकाता अत्याचाराच्या घटनेनंतर गोवा सतर्क; गोमेकॉत टास्क फोर्सची स्थापना, ठरले पहिलेच राज्य..

GMC Task Force: गोमेकॉतील डॉक्टरांनी संप पुकारला होता यामध्ये डॉक्टरांची सुरक्षा हा मुद्दादेखील होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने देशभरात डॉक्टरांनी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी संप केला होता. गोव्यातही त्याचे पडसाद उमटले होते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील स्थानिक डॉक्टरांनी संप केला होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोमेकॉने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.

दरम्यान, विश्‍वजीत राणे यांनी टास्क फोर्सची स्थापना करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी गोमेकॉतील स्थानिक डॉक्टरांनी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी संपही पुकारला होता. ज्याचा परिणाम नियोजित शास्त्रक्रियांवरदेखील झाला होता. या डॉक्टरांच्या विविध मागण्या होत्या.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. यामध्ये डॉक्टरांची सुरक्षा हा मुद्दादेखील होता. डॉक्टरांची सुरक्षा प्रथम आणि वैद्यकिय व्यावसायिकांच्या कल्याणासाठी आम्ही काम करत आहोत, हे सिद्ध करणारा निर्णय गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT