Tarun Tejpal case The next hearing is on June 2 in Mapusa Additional Sessions Court 
गोवा

Tarun Tejpal case : पीडित तरुणीची ओळख दर्शवणारी काही माहिती काढून टाका, न्यायालयाचे निर्देश

दैनिक गोमंतक

म्हपसा : तरुण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला गोवा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी झाली. निवाड्यामध्ये पीडित तरुणीची ओळख दर्शवणारी काही माहिती असल्याने ती काढून टाकण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत व त्यावरील पुढील सुनावणी येत्या 2 जूनला ठेवली आहे. (Tarun Tejpal case The next hearing is on June 2 in Mapusa Additional Sessions Court)

तेहलकाचे (Tehelka) माजी संस्थापक-संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. म्हापसा (Mapusa) येथील गोवा सत्र न्यायालयाने या 21 मे रोजी बद्दलचा निकाल दिला होता.  हा निकाल समोर आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांनी या निकालाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.  त्यानुसार गोवा सरकारने आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

21 मी रोजी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायमुर्ती क्षमा जोशी यांनी या प्रकरणाचा निवाडा दिला होता. त्यानंतर निकालानंतर पणजी (Panjim) येथे पत्रकार परिषदेत बोलताना "तेजपाल प्रकरणात सर्व ठोस पुरावे उपलब्ध असताना एका महिलेवर झालेला अन्याय गोवा राज्यात सहन केला जाणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचे म्हणत, या प्रकरणी संशयिताच्या विरोधात ठोस पुरावे असल्यामुळे तो संशयित या प्रकरणातून सुटूच शकत नाही असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT