Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: लोकसभेच्या दोन्हीही जागा जिंकण्याचे लक्ष्य - तानावडे

25 हजारांच्या उपस्थितीने शहांची सभा करणार यशस्वी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये गोव्यातील दोन्हीही जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 एप्रिल रोजी गोव्यात येत आहेत.

दुपारी 4 वाजता त्यांची फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेला 25 हजार कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

तानावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकांसाठी अद्यापही वेळ असला, तरी पक्षाच्या केंद्रीय कमिटीने तयारी सुरू केली आहे. राज्यात बहुतांश मतदारसंघात आणि बूथ व शक्ती केंद्र स्तरावर कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारण्यात आले आहे.

आज पक्षाकडे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार, ३३ आमदार, दोन खासदार आहेत. याच्या आधारावर भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा सहज जिंकेल. मात्र, आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे.

अमित शहा सकाळी महाराष्ट्राचा दौरा संपून दुपारी राज्यात दाखल होतील. फार्मागुढी येथील सभा संपल्यानंतर ते पक्षाचे कार्यकारिणी, मंत्री, आमदार आणि मंडल अध्यक्ष व सचिव यांना मार्गदर्शन करतील.

भाजपने कसली कंबर

केंद्रीयमंत्री अमित शहा यांची सभा यशस्वी करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी आज दक्षिण गोव्यातील बहुतांश तालुक्यांसाठीच्या तयारीच्या सभा घेतल्या.

यात वास्को - मुरगाव, मडगाव आणि फोंड्याच्या सभांचा समावेश आहे. या सर्व सभांना तालुका पातळीवरचे आणि मतदारसंघ स्तराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हादईबाबत तडजोड नाही

म्हादई हा आमच्या सरकारबरोबर राज्यातील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ती राज्याची जीवनदायिनी आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व कार्यकर्ते कर्नाटकातील भाजपच्या प्रचारासाठी गेले तरी आमच्या म्हादईबाबतच्या धोरणामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. किंवा याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही, असे तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT