Goa Bank Fraud Case X
गोवा

Tanvi Vasta Case: '१० टक्‍के कमिशन'ने सुरूवात, तपासात उलगडला तन्वीचा फसवणुकीचा पॅटर्न, घोटाळ्यांची संख्या 25 वर

Goa Bank Fraud Case: तन्‍वी वस्‍त आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव यांच्‍या घोटाळ्‍यांनी पंचविशी पार केली असून आतापर्यंत या दोघांच्‍या विरोधात ६ एफआयआर नोंद झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Tanvi Vasta Central Bank Manager Anand Jadhav Fraud Case

मडगाव: वृद्ध आणि नेट बँकिंगची माहिती नसलेल्‍या ग्राहकांना गाठून त्‍यांना गंडा घालणारी तन्‍वी वस्‍त आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव यांच्‍या घोटाळ्‍यांनी पंचविशी पार केली असून आतापर्यंत या दोघांच्‍या विरोधात ६ एफआयआर नोंद झाले आहेत.

तन्‍वी वस्‍त ही कुडचडेच्‍या सेंट्रल बँकेच्‍या शाखेत एका खासगी एजन्‍सीसाठी काम करत होती. हे काम करताना तन्‍वीने लाेकांशी गोड बोलून त्‍यांचा विश्‍वास संपादन केला हाेता. सध्‍या कुडचडे पोलिसांकडे लोकांच्‍या तक्रारींचा ओघ लागला असून त्‍यातील कित्‍येकांना आपली नेमकी किती रक्‍कम तन्‍वीने स्वत:च्या खात्‍यात वळविली, तेही माहीत नाही.

यातील कित्‍येकांनी आपले पासबुक तन्‍वीच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यांनी आता बँकेत धाव घेऊन आपली किती रक्‍कम नाहीशी झाली ते जाणून घेण्‍यासाठी प्रयत्‍न केला आहे. त्‍यामुळे सेंट्रल बँकेच्‍या कुडचडे शाखेत लाेकांची गर्दी वाढू लागली आहे.

फसवणूक दोन कोटींच्या आसपास

याप्रकरणी कुडचडे पोलिस स्‍थानकात २१ तक्रारी नोंदविण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे हा एकंदर घोटाळा दोन काेटींच्‍या आसपास जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. कुडचडेचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण यांना विचारले असता, कालपर्यंत आमच्‍याकडे अतिरिक्‍त १९ तक्रारी आल्‍या हाेत्‍या. त्‍यात आज आणखी दाेन तक्रारींची भर पडली आहे. या सर्व तक्रारींची आम्‍ही शहानिशा करत आहोत. त्‍यानंतरच आम्‍ही या सर्व प्रकरणांत एफआयआर दाखल करून घेऊ, असे त्‍यांनी सांगितले.

१० टक्‍के कमिशन

तन्‍वीने प्रारंभी सामान्‍य लोकांना बँकेचे लघु रकमेचे कर्ज मिळवून द्यायला सुरुवात केली. त्‍यासाठी ती दहा टक्‍के कमिशन घ्यायची. सामान्‍य लोकांना स्‍वत:चा व्‍यवसाय सुरू करता यावा, यासाठी एका योजनेखाली ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तन्‍वीने काही लोकांना हे कर्ज मिळवून दिले. मात्र, त्‍यातील ५ हजार रुपये ती कमिशन म्‍हणून घेत असे. अशा तऱ्हेने तिने लोकांचा विश्‍वास संपादन केला आणि नंतर तुमचे पैसे ‘एफडी’मध्‍ये गुंतवते, असे सांगून त्‍यांचे लाखो रुपये स्वत:च्या खात्‍यात वळते केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT