Dawarli News Dainik Gomantak
गोवा

Dawarli News: कचरा समस्येवर तोडग्यासाठी पावले उचला : आमदार तुयेकर

दवर्ली येथे टाकाऊ साहित्य वर्गीकरण शेडची पायाभरणी करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

दिकरपाल-दवर्ली पंचायतीचा आदर्श ठेवून नावेली मतदारसंघातील इतर पंचायतींनी कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी केले.

दवर्ली येथे टाकाऊ साहित्य वर्गीकरण शेडच्या (एमआरएफ) पायाभरणीवेळी ते बोलत होते. यावेळी दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, दिकरपाल-दवर्लीचे सरपंच हर्क्युलान नियासो, पंच संपदा नाईक, विद्याधर आर्लेकर, साईश राजाध्यक्ष, फा. डाॅमनिक नोरोन्हा व ग्रामस्थ उपस्थित होते.

कचरा समस्या सगळीकडे भेडसावत आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचे प्रकार घडत असल्याने जागोजागी उकिरडे निर्माण झाले आहेत. कचऱ्याची समस्या उग्र होत असल्याचे दिसून येत असताना दिकरपाल-दवर्ली पंचायतीने एमआरएफ शेड उभारण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया स्तुत्य आहे. या पंचायतीला कचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडून आवश्यक असलेले सहकार्य मिळवून देण्यास आपण कटिबद्ध आहे. - उल्हास तुयेकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT